27 July 2024 6:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

MPSC Recruitment 2023 | खुशखबर! MPSC मार्फत 615 PSI पदाची भरती, असा करा ऑनलाइन अर्ज

MPSC Recruitment 2023

MPSC Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगात पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 615 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी 03 ऑक्टोबर 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि या भरती 2023 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली देण्यात आला आहे.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई म्हणून निवड केली जाईल

एकूण उपलब्ध जागा : 615

पदाचे नाव :

पोलिस उपनिरीक्षक (PSI)

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही शाखेतील पदवी+04 वर्षे नियमित सेवा किंवा 12वी उत्तीर्ण+05 वर्षे नियमित सेवा किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे नियमित सेवा.

वयाची अट :

03 ऑक्टोबेर 2023 रोजी 35 वर्षे जास्तीत जास्त (मगासवर्ग +05 वर्षे सूट )

नोकरी ठिकाण :

महाराष्ट्र

अर्ज शुल्क :

* खुला वर्ग : रुपये 544/-
* मागासवर्ग – रुपये 344

पूर्व परीक्षा तारीख | MPSC Exam Date 2023

02 डिसेम्बर 2023

परीक्षा केंद्र :

छत्रपती संभाजी नगर, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती व नाशिक

पगार :

दरमहा 38 हजार ते 1 लाख 22 हजार रुपयांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

03 ऑक्टोबर 2023 (11.59 PM)

अधिकृत जाहिरात – PDF साठी येथे क्लीक करा

ऑनलाइन अर्ज (सुरू 11 सप्टेंबर 2023) – येथे क्लीक करा

News Title : MPSC Recruitment 2023 for 615 PSI posts check details 10 September 2023 Marathi news.

हॅशटॅग्स

#MPSC Recruitment 2023(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x