15 May 2021 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हे वर्ष अधिक जीवघेणं असेल | महामारीच्या या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील - WHO
x

कृष्णकुंजवर राज भेट झाली नाही | कुणाल कामराने राऊतांकडे कॉमेडी मोर्चा वळवला

Kunal Kamra, Shivsena MP Sanjay Raut, Shut Up Ya Kunal

मुंबई, ५ ऑक्टोबर : स्डँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर ‘Shut Up Ya Kunal’ या कार्यक्रमात संजय राऊत कुणाल कामरांना मुलाखत देणार असल्याबद्दल चर्चा सुरू झाली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कुणाल कामरा यांचा ‘Shut Up Ya Kunal’ कार्यक्रम नेटिझन्समध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात कामरा हे अनेक राजकीय नेत्यांसोबत अनौपचारिक गप्पा मारताना दिसतात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनबद्दल जेव्हा चर्चा सुरू झाली, तेव्हा स्वतः कुणाल कामरा यांनी एक ट्वीट केलं. ‘Shut Up Ya Kunal’ च्या दुसऱ्या सीझनचे पहिले पाहुणे म्हणून येण्यासाठी संजय राऊत तयार झाले तरच मी हा कार्यक्रम सुरू करेन, अन्यथा नाही, असं कामरा यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

या ट्वीटला संजय राऊत यांनी प्रतिसाद दिल्यानंतर कुणाल कामरा यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. स्वतः संजय राऊत यांनी या भेटीचा फोटो ट्वीट केला. त्यामुळे कामरा यांच्यासोबत राऊत यांच्या अनौपचारिक गप्पामधून नेमकं काय साध्य होणार ते पहाव लागणार आहे.

दुसऱ्या सीझनसाठी संजय राऊत यांना निमंत्रित करण्यापूर्वी कुणाल कामरा यांनी राज ठाकरेंनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं. “मी बरंच संशोधन केलं. तुम्ही मुंबईतील कीर्ती वडापावचे मोठे चाहते असल्याचं लक्षात आलं. मी तुम्हाला तुमचा आवडता पदार्थ लाच म्हणून देतो आहे, जेणेकरुन तुम्ही माझ्या ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ द्याल.” असं काही महिन्यांपूर्वी कुणाल कामरांनी म्हटलं होतं.

 

News English Summary: The comedian posted the picture with a caption ‘Shut up ya Kunal 2.0’. Kunal Kamra started his web-series titled Shut Up Ya Kunal in July 2017 along with Ramit Verma. The episodes typically feature a conversation with one or more invited guests, interposed with clips of news segments or debates, edited for humour. Now it will be interesting to see whether the Shiv Sena MP will appear on his show.

News English Title: Kunal Kamra meet Shivsena MP Sanjay Raut over Shut Up Ya Kunal Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(215)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x