13 December 2024 2:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

२००२ मध्ये गुजरातच्या पोलीस प्रमुखांनी अमित शहांवर पोलीस दलाचा गैरवापर केल्याचा आरोप केलेला - काँग्रेस

Congress, spokesperson Sachin Sawant, G Vanjara case,Amit Shah

मुंबई, २१ मार्च: परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्बनंतर काँग्रेसने देखील महाविकास आघडीचा बचाव करताना भाजपवर प्रहार केला आहे. या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं की, ‘२००२ मध्ये डी. जी. वंजारा गुजरात पोलीस दलाचे प्रमुख होते. गृहमंत्री अमित शाह पोलीस दलाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी शहांनी राजीनामा दिला होता का? वंजारा यांच्यासारखेच आरोप पोलीस अधिकारी संजीव भट यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर केले होते. त्यावेळी मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता का?, असे प्रश्न सावंत यांनी विचारले.

विरोधी पक्षाच्या सरकारला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचण्यात भारतीय जनता पक्षाचा हातखंडा आहे. याआधी अनेकदा भारतीय जनता पक्षानं अशी कारस्थानं रचली आहेत, असा दावा सावंत यांनी केला. भाजपचं षडयंत्र स्क्रिप्टेड असतं. पोलीस आयुक्त पदावरून दूर झालेले परमबीर सिंग पत्र लिहिणार याची भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कल्पना होती. त्यांना सगळं आधीपासूनच माहीत होतं. त्यामुळेच तर पत्र बाहेर येताच फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली, असं सावंत यांनी म्हटलं.

साम दाम दंड भेद वापरून कोणत्याही परिस्थितीत सत्ता परिवर्तन करायचं, सत्ता बळकवायची, जनतेनं पाठिंबा दिला नसेल, तर तो पाठिंबा गैर मार्गाने मिळवण्याचा भारतीय जनता पक्षाचा सातत्याने प्रयत्न असतो. यासाठी केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग केला जातोय, हे वेळोवेळी दिसतं आहे. वर्षभरापासून महाविकासआघाडी सरकार ज्या पद्धतीचे अत्याचार केंद्र सरकारकडून सहन करत आहे. वेळो वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकऱणात तीन-तीन तपास यंत्रणांना आणलं गेलं, मुंबई पोलिसांची बदनामी केली गेली ही पार्श्वभूमी आपल्याला विसरता येण्यासारखी नाही. एकंदरच या सर्व यंत्रणासाठी राजकीय स्वार्थासाठी वापर केला जातो आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही.” असं देखील त्यांनी बोलून दाखवलं.

याशिवाय, ”महाविकासआघाडी सरकारला बदनाम करण्याचा पूर्ण डाव भारतीय जनता पक्षाचा आहे, त्याच्यावर माध्यमांमधील एक भाग चालतो आहे ही वस्तूस्थिती आहे. मोठ षडयंत्र रचण्याची भारतीय जनता पक्षाचा क्षमता या अगोदर देखील दिसून आलेली आहे. प्रशासकीय यंत्रणा व अधिकाऱ्यांवर कशाप्रकारे केंद्रीय यंत्रणांचा दबाव आहे, हे देखीवल आपण पाहिलेलं आहे.” असं सावंत म्हणाले.

 

News English Summary: Congress spokesperson Sachin Sawant said, G. Vanjara was the chief of the Gujarat police force. He had alleged that Home Minister Amit Shah was abusing the police force. Did Shah resign at that time? Similar allegations were made by police officer Sanjeev Bhat against the then Gujarat Chief Minister Narendra Modi. Did Modi resign as the Chief Minister at that time ?, Sawant asked

News English Title: Congress spokesperson Sachin Sawant highlight G Vanjara case related to Gujarat news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x