27 May 2022 5:12 AM
अँप डाउनलोड

सुशांत प्रकरण: अमृता फडणवीस यांची पुन्हा अप्रत्यक्षरित्या ठाकरे सरकारवर टीका

Aamruta Fadnavis, Sushant Singh Rajput suicide

मुंबई, ४ ऑगस्ट : असुरक्षित वाटत असेल तर अमृता फडणवीस यांनी राज्य सोडून जावं असं शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर बोलताना अमृता फडणवीस यांनी तपास ज्याप्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अनिल परब यांनी जोरदार टीका केली होती. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मात्र त्यानंतर देखील अमृता फडणवीस यांनी पुन्हा ट्विट करत अप्रत्यक्ष टीका केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

अमृता फडणवीस यांनी एक शायरी ट्विटरवर पोस्ट केली आहे. “रहते हैं शीषमहलों में जो, वो अवाम से दूरी बनाया करते हैं ! मगर हम तो वो शक़्स हैं, जो पत्थरों से घर बनाया करते हैं ! भूल गए हैं वो कांच के घरो में रहकर ख़ुद, छुपाएं कुछ छुपता नहीं ! हम फरेबियोंको ठोकरों में,और सच को सीने से लगाया करते हैं !” ही शायरी अमृता फडणवीस यांनी ट्विट केली आहे. यासोबतच त्यांनी JaiShreeRam, JusticeForSushant, Disha असे तीन हॅशटॅगही वापरले आहेत.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis’ wife Amrita Fadnavis had criticized the Mumbai police on condition of anonymity over actor Sushant Singh Rajput suicide. After that, now Amrita Fadnavis has indirectly criticized the Thackeray government.

News English Title: Amruta Fadnavis one more tweet on actor Sushant Singh Rajput suicide death case News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x