गुजरातच्या माजी गृहमंत्र्यांवर आरोप करणारे IPS संजीव भट्ट जेलमध्ये | परमवीर सिंह कोर्टात आणि भक्त...
मुंबई, २३ मार्च: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याच्याकडे दरमहा १०० कोटी रुपये मागितले होते, असा धक्कादायक आरोप गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीरसिंग यांनी केला होता. अँटिलिया स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरणावरून नुकतेच परमबीर यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवण्यात आले आहे. परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून यामध्ये थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. पत्राची प्रत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही पाठवली आहे. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे.
त्यानंतर परमबीर सिंग यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपण जे आरोप केले आहेत. त्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी सिंग यांनी या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेत आपण केल्या सर्व आरोपांची चौकशी करावी. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख आणि वसुली प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. परमबीर यांनी पत्रात लिहिलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. एकूण 130 पानांची याचिका परमबीर सिंह यांनी दाखल केली आहे.
दरम्यान, पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांच्याकडून हे आरोप झाले. डांगे यांनी फेब्रुवारीत राज्याच्या अतिरिक्त गृह सचिवांना पत्र लिहिले होते. यात परमबीरसिंग यांच्या अंडरवर्ल्डशी संबंधांचा खुलासा केला होता. आता याच विषयाला अनुसरून आणि गुजरातमधील तत्कालीन आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनी गुजरातच्या तत्कालीन गृहमंत्र्यांवर केलेले आरोप आणि नंतर त्यांना देण्यात आलेला त्रास याप्रकरणाची भाई जगताप यांनी भाजपाला आठवण करून दिली आहे. यावरून भाजप उच्च पदावरील अधिकाऱ्यांना स्वतःच्या सोयीनुसार कसं वापरतं याची देखील आठवण करून दिली आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे, “गुजरातच्या तत्कालीन गृहमंत्र्यांवर आरोप करणारे आयपीएस संजीव भट्ट जेलमध्ये…परमवीर सिंह कोर्ट फिरतायत…आणि भक्त लोकशाही वर ज्ञान पाजळतायत..!!
गुजरातच्या तत्कालीन गृहमंत्र्यांवर आरोप करणारे आयपीएस संजीव भट्ट जेलमध्ये
परमवीर सिंह कोर्ट फिरतायत…
आणि भक्त लोकशाही वर ज्ञान पाजळतायत..!!
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) March 23, 2021
News English Summary: A petition has been filed in the Supreme Court by Parambir Singh. The allegations you have made in your letter to the Chief Minister. Singh has demanded an inquiry into the allegations. All the allegations made by you in this petition should be investigated. Parambir Singh has demanded a CBI probe into the Anil Deshmukh and recovery case
News English Title: Mumbai congress president Bhai Jagtap criticised BJP over politics on Parambir Singh news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC