18 April 2024 4:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! या शेअरने 3 वर्षात दिला 358% परतावा, आता सकारात्मक बातमी आली IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मालामाल होण्याची संधी, मजबूत फायदा होईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करतोय, खरेदीला गर्दी Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस?
x

चौकशी होईपर्यंत मी मंत्रिपदापासून दूर राहायला हवे ही माझी भूमिका - संजय राठोड

Sanjay Rathod, Pooja Chavan, Shivsena

मुंबई, २८ फेब्रुवारी: पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेचे आमदार आणि विद्यमान वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेल्यानंतर आज दुसऱ्यादा ते प्रसारमाध्यमांमोर आले. मुंबईतील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते आपले म्हणणे मांडत होते.

दरम्यान, यासंदर्भात संजय राठोड यांनी देखील भाष्य केलं आहे. मी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. विरोधी पक्षानं अतिशय घाणेरडं राजकारण केलं. मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न केला. माझ्या समाजाची बदनामी केली गेली.निष्पक्षपणे चौकशी व्हावी अशीच माझी मागणी. मुख्यमंत्र्यांकडे मी अशीच मागणी केली आहे. मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, आमदारकीचा नाही. ज्या पद्धतीनं राजकारण केलं केलं, ते लोकशाहीच्याविरोधात आहे, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान आहे. अधिवेशन बंद पाडण्याची भाषा अपमानजनक, कोणत्याही प्रकरणाची चौकशी आधी व्हायला पाहिजे असं संजय राठोड म्हणाले. (Sanjay Rathore said that the language used to close the convention was insulting and any matter should be investigated first)

तसेच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, याच कारणामुळे मी मंत्रिपदापासून बाजूला होत आहे, असे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे संजय राठोड म्हणाले. मी मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदाचा राजीनामा देत असताना माझ्या सोबत अनिल परब आणि अनिल देसाई उपस्थित होते, असेही राठोड म्हणाले. चौकशी होईपर्यंत मी मंत्रिपदापासून दूर राहायला हवे ही माझी भूमिका असल्याचे ते म्हणाले.

 

News English Summary: Sanjay Rathore said that he had told Chief Minister Uddhav Thackeray that there was a need for an impartial inquiry into the death of Pooja Chavan. “I was accompanied by Anil Parab and Anil Desai when I was resigning from the ministry,” Rathore said. “It is my role to stay out of the ministry until the inquiry is over,” he said.

News English Title: It is my responsibility to stay out of the ministry until the inquiry is over said Sanjay Rathod news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x