24 September 2023 3:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vivo T2 Pro 5G | विवो T2 प्रो 5G स्मार्टफोनची इतकी क्रेझ का आहे? बजेट किंमतीत दमदार फीचर्स आणि स्पेफिकेशन्स Numerology Horoscope | 24 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Stocks to Buy | गुंतवणूकीसाठी ही टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 39 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले टॉप 3 शेअर्स, अल्पावधीत 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, लिस्ट सेव्ह करा Mufin Green Share Price | श्रीमंत करतोय शेअर! मागील 5 वर्षांत शेअरने 2077% परतावा दिला, काल 20% परतावा दिला, किंमत 68 रुपये Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 24 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तुफान तेजीत येणार, कंपनीला एका मागून एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा सपाटा, फायदा घेणार?
x

महाराष्ट्रातील शिक्षकांना 'वंदे गुजरात' या गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षणाचा 'विनोदी' घाट

नाशिक : काही दिवसांपूर्वी इयत्ता ८ वीच्या पुस्तकात गुजराती भाषेत मजकूर छापून आल्याचे गंभीर प्रकरण अजून ताजे असताना त्यात अजून एका शैक्षणिक ‘विनोदी’ निर्णय घेण्यात आला आहे. आता महाराष्ट्रातील शिक्षकांना थेट ‘वंदे गुजरात’ या गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा “अति विनोदी” घाट महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने घातला आहे.

इयत्ता पहिली तसेच आठवीच्या अभ्यासक्रमात नुकतेच काही बदल करण्यात आले आहेत. या नव्या अभ्यासक्रमासाठी संबंधित विषयासाठी शिक्षकांना येत्या २४ ते २६ सप्टेंबर रोजी व्हर्चुअल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. परंतु राज्याच्या शिक्षण विभागाने दूरदर्शनच्या मराठी ‘सह्याद्री’ वहिनीला डावलून ‘वंदे गुजरात’ या गुजराती वाहिनीची ‘विनोदी’ निवड केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अजून धक्कादायक म्हणजे जी वाहिनी महाराष्ट्रात दिसतच नाही त्या वाहिनीची जबरदस्ती करून ‘डिश बॉक्स बसवावा’ अथवा ज्यांना हे शक्य नाही त्यांनी ‘जिओ टीव्ही’ (इथेही गुजराती) अँपमधील वंदे गुजरात वाहिनी बघावी, असे विनोदी आदेश देण्यात आले आहेत.

त्यात कहर म्हणजे ज्या शाळांमध्ये टीव्ही नसतील, त्या शाळेतील शिक्षकांनी दुसऱ्या शाळेत जिथे टीव्ही उपलब्ध आहे अशा ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घ्यावे असे आदेश देण्यात आले आहेत. त्यात शिक्षकांना सुद्धा प्रश्न पडला आहे की आता हे प्रशिक्षण गुजरातीत नसले म्हणजे मिळवलं, परंतु सरकारला गुजरातचा इतका ‘विनोदी’ पुळका कशासाठी असा प्रश्न तमाम शिक्षकांना पडला आहे.

हॅशटॅग्स

#Vinod Tawde(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x