14 November 2019 12:03 AM
अँप डाउनलोड

जम्मू काश्मिरात अपहरण झालेल्या ३ पोलीस कर्मचाऱ्यांची दहशतवाद्यांकडून हत्या, एकाची सुटका

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात ३ एसपीओ’सहित ४ पोलीस बेपत्ता झाल्याचे समोर आलं होत. त्यानंतर दहशतवाद्यांकडूनच या चार पोलीस कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्रसिद्ध झाली होती. परंतु, आज ४ पैकी ३ पोलीस कर्मचाऱ्यांची दहशतवाद्यांकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सुदैवाने दहशतवाद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला सोडून दिले आहे.

कुख्यात दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनने काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील पोलिसांना नोकरी सोडण्याची धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवरच ते अपहरण झाल्याचे म्हटले जात आहे. गुरुवारी रात्री शोपियांमधून स्पेशल पोलीस अधिकारी फयाज अहमद, फिरदौस अहमद, कुलदीप सिंग, आणि पोलीस निसार अहमद या ४ पोलिसांचे अपहरण करण्यात आले होते. त्यातील एकाला दहशतवाद्यांनी सोडून दिले असले तरी इतर तिघांना त्यांनी निर्दयीपणे ठार केले आहे अशी माहिती प्राप्त झाले आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1036)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या