26 May 2022 7:33 PM
अँप डाउनलोड

पुन्हां भारत बंद, बिहारमध्ये हिंसा भडकली

पाटणा : बिहार मध्ये भारत बंद ने पुन्हां तोंड वर केलं असून अनेक जाळपोळीच्या घटना घडत असल्याचे समजते. बिहार मधील अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार वाढत असून अनेक ठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. मोठा जनसमुदाय वाढू लागण्याने जाळपोळीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

एक्सप्रेसवे वर गाड्या अडवण्यात येत असून, आंदोलकांनी श्रमजीवी एक्स्प्रेस आरा येथे रोखून धरली आहे. शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधील जातीवर आधारित आरक्षणाविरोधात हे अंदोलन पेटले आहे. आरामध्ये जातीय आरक्षणाचे समर्थक आणि विरोधक आमनेसामने आल्याने झालेल्या हिंसाचारात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

अॅट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेल्या बदलांविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. त्याला उत्तर म्हणून हे आंदोलन पेटल्याचे बोलले जात आहे. सरकारने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राज्यस्थान मध्ये सतर्कतेचे आदेश दिले आहेत. परंतु अधिकृतपणे कोणत्याही संस्थेने या आंदोलनाची जवाबदारी स्वीकारलेली नाही. समाज माध्यमांच्या आडून हे भारत बंदचे मेसेज मोठ्या संख्येने पसरवण्यात आले होते त्यानंतर सरकारने सतर्कतेचे आदेश जरी केले होते.

हॅशटॅग्स

#Amit Shah(261)#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x