2 July 2020 9:36 PM
अँप डाउनलोड

येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; कर्नाटकात कमळ फुलले

bs yediyurappa, Kumarswamy, JDS, Congress, Siddharamaya, Amit Shah, Karnataka Assembly

बंगळुरू : कर्नाटकात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. कर्नाटकात सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री म्हणून शुक्रवारी शपथ घेतली. त्यानंतर त्यांना विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी आजपर्यंतची मुदत देण्यात आली होती. जो त्यांनी आवाजी मतदानाने जिंकला आहे. त्यामुळे कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे सरकार कायम झाले आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

आज कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. या ठरावत भाजपला १०६ मते पडली. तर काँग्रेस जेडीएस यांनी विरोधात मतदान केले. विरोधी बाजूकडे एकूण १०० मते पडली. त्यामुळे येडीयुरप्पा सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध करत सत्ता स्थापन केली आहे.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर येडियुरप्पा हे विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकणार का याची उत्सुकता सर्वांना लागली होती. दरम्यान, आज विधानसभेत बहुमत सिद्ध करू, असा विश्वास येडियुरप्पांनी व्यक्त केला होता आणि तो सत्यात उतरला आहे. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये देखील भारतीय जनता पक्षाची राजवट सुरु झाली आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#karnatak Assembly Election 2018(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x