3 December 2024 7:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | आता प्रत्येक महिला व्याजाने कमवेल 30000; जाणून घ्या पोस्टाच्या योजनेची फायद्याची गोष्ट - Marathi News Mutual Fund SIP | पैशाचे पैसा वाढवा, बचत फक्त 167 रुपये, पण परतावा मिळेल 5 कोटी रुपये, जाणून घ्या अनोखा फंडा - Marathi News Waaree Renewables Share Price | 49,968% परतावा देणारा शेअर रॉकेट होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - SGX Nifty Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty Vedanta Share Price | वेंदाता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, संधी सोडू नका - SGX Nifty Ola electric | ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत 30 टक्क्यांची मोठी घट; नेमकं कारण काय जाणून घ्या - Marathi News Home Loan | गृहकर्जावर बँक वसूलते एकूण 6 प्रकारचे चार्जेस; पहिल्यांदाच लोन घेणाऱ्यांना हे माहित असणे गरजेचे आहे
x

तर तिन्ही पक्ष एक उमेदवार देतील | त्या आमदाराला राजकारणातून बाद केले जाईल

NCP minister Jayant Patil, Mahavikas Aghadi MLAs, BJP Operation lotus, Marathi News ABP Maza

मुंबई, १० सप्टेंबर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार अशी अफवा भाजपवाले सतत पसरवत असतात. परंतू, महाविकासआघाडी सरकार पूर्णपणे स्थिर आहे. राज्यातील सरकार पडेल असे सांगणे हा केवळ भाजपचा स्वत:ला चर्चत ठेवण्याचा प्रयत्न आहे असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.

महाविकासआघाडी सरकारमधून जर कोणी एखादा आमदार फुटलाच तर त्या आमदाराला राजकारणातून बाद केले जाईल, असा थेट इशारा राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे. राजस्थानमध्ये काय घडले हे उदाहरण समोरच असल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. जयंत पाटील हे एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या ऑनलाईन मुलाखतीत बोलत होते.

जयंत पाटील यांनी इशारा दिला की, जर एखादा आमदार महाविकासआघाडीतून फुटून इतरत्र गेलाच. तर महाविकाआघाडीतील राष्ट्रावादी, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन एक उमेदवार देतील आणि संबंधीत उमेदवाराचा पराभव करतील. त्यामुळे शक्यतो काणी आमदार अशा प्रकारचे धाडस करणार नाही.

 

News English Summary: If an MLA breaks away from the Maha Vikas Aghadi and goes elsewhere. The NCP, Shiv Sena and Congress in the Mahavika alliance will come together and field a candidate and defeat the candidate concerned. Therefore, it is possible that some MLAs will not take such a step.

News English Title: NCP minister Jayant Patil warns Mahavikas Aghadi MLA about BJP Operation lotus Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x