5 June 2023 9:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | तो फ्लॅटफॉर्मवर तरुणीच्या मागे सावकाश चालत होता, मेट्रो ट्रेन जवळ येताच तिला उचलून रुळावर उडी मारली आणि.... Spider-Man | स्पायडरमॅन चित्रपटाने अवघ्या 4 दिवसात 1700 कोटींचा टप्पा ओलांडला, भारतीय बॉक्स ऑफिसवर एक विक्रम Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 06 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Kore Digital IPO | कोर डिजिटल IPO किती सबस्क्राईब झाला? शेअरची ग्रे मार्केट प्राईस पहिल्याच दिवशी मोठा परतावा देणार? Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या स्वस्त शेअर्समध्ये बंपर तेजी, एका महिन्यात 65 टक्के परतावा दिला Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअरमध्ये आदळ आपट सुरू, काही शेअर्स हिरव्या निशाणीवर तर काही शेअर्स लाल Numerology Horoscope | 06 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे

mucomycosis a black fungus

मुंबई, १५ मे  | देशातील १५ राज्यांत एक दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त नोंदली गेली. या राज्यांत महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, बिहार, तेलंगण, पंजाब, आसाम, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल, गोवा आणि चंदीगड यांचा समावेश आहे. देशात शुक्रवारी ३,३३,६०९ नवे रुग्ण आढळले. गुरुवारी ही संख्या ९,५३५ ने जास्त होती. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या त्यापेक्षा जास्त म्हणजे ३,६३,२९४ राहिली. तथापि, मृत्यूचे आकडे वाढतेच आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा ४,०५० मृत्यूंची नोंद झाली. शुक्रवारी महाराष्ट्रातही नव्या रुग्णांच्या संख्येत घट दिसली.

दुसरीकडे, महाराष्ट्रात कोरोना संसर्ग काळातच म्यूकरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगसमुळे आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, म्यूकरमायकोसिसचा संसर्ग कोरोनातून बरे होत असलेल्या आणि झालेल्या काही रुग्णांमध्ये दिसत आहे. या रुग्णांत डोकेदुखी, ताप, डोळ्यांत वेदना, नाकात संसर्ग आणि अंशत: दृष्टिबाधा अशी लक्षणे दिसत आहेत. म्यूकरमायकोसिसमुळे ज्या ५२ लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी सर्व जण कोरोनातून बरे झाले होते.

महाराष्ट्रात आरोग्य विभागाने प्रथमच म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यू झालेल्यांची यादी तयार केली आहे. तत्पूर्वी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले होते की, राज्यात म्यूकरमायकोसिसचे १५०० रुग्ण आहेत. रुग्ण वाढल्याने राज्याच्या आरोग्य विभागावर बोजा वाढू शकतो. म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांच्या उपचारांसाठी एक लाख अॅम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन खरेदीसाठी राज्य सरकार निविदा काढणार आहे.
दरम्यान, आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले की, ज्यांना मधुमेह आहे किंवा ज्यांच्या रक्तशर्करा स्तरात चढ-उतार होतो अथवा ज्यांच्या रक्तात लोहाचे प्रमाण जास्त आहे, अशा कोरोना रुग्णांना म्यूकरमायकोसिस होतो. राज्य सरकारने अशा रुग्णांच्या उपचारांसाठी १८ वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांत वेगळा वॉर्ड बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

News English Summary: In Maharashtra, 52 people have died due to mucomycosis, a black fungus, during the corona infection. A senior health official said the infection with mucorrhoea was seen in some patients recovering from coronary heart disease.

News English Title: 52 people have died due to mucomycosis a black fungus in Maharashta news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x