27 July 2024 4:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खुशखबर! 35 हजार पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना ग्रॅच्युइटी इतकी रक्कम मिळणार Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट Lakshmi Narayan Rajyog | लक्ष्मी-नारायण योग 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, आर्थिक नशीब उजळवणार FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI? Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल
x

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विक्रम, शिवसेना फुटीनंतरही 2019 पेक्षा अधिक मतं वाढली, भाजप-शिंदेसाठी धोक्याची घंटा

Rutuja Latke

Andheri East Assembly Election Result | अंधेरी पूर्व या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. त्यांच्या विजयाबाबत फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. पण या पोटनिवडणुकीत एक महत्त्वाची गोष्ट समोर येतेय. भाजपने या पोटनिवडणुकीत स्थानिक प्रतिनिधींच्या मार्फत नोटाचं बटन दाबून आपला राग व्यक्त करण्याची विनंती केली होती. मात्र निवडणुकीचं एकूण मतदान झालं त्यापैकी सर्वाधिक मतदार ऋतुजा लटके म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतदान करण्यासाठी उतरल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेचे माजी आणि दिवंगत आमदार रमेश लटके यांना २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत एकूण 62773 मतं पडली होती. मात्र शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडूनही मतदारांना उद्धव ठाकरे आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेप्रती प्रेम असल्याचं सिद्ध झालं आहे. कारण या या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना १९ व्या फेरी अंती एकूण 66,247 मतं पडली आहेत. त्यामुळे शिवसेनेची मतं अजून वाढल्याने ही भाजप आणि शिंदे गटासाठी धोक्याची घंटा मानली जातेय. दरम्यान विजयी उमेदवार ऋतुजा लटके यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच अनेकांनी नोटाचं बटन का दाबलं? याबाबत ऋतुजा यांनी नागरिकांनाच प्रश्न विचारावं अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. याशिवाय नोटाला जे मतदान झालंय ते भाजपसाठी झालेलं मतदान आहे, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक निकाल : 19वी फेरी
* पोटनिवडणुकीत एकुण मतदान – 86,198
* ऋतुजा लटके – 66,247
* बाळा नाडार – 1,506
* मनोज नाईक – 888
* मीना खेडेकर – 1,511
* फरहान सय्यद – 1,087
* मिलिंद कांबळे – 614
* राजेश त्रिपाठी – 1,569
* नोटा – 12,776

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Rutuja Latke victory with 66247 votes in Andheri By Poll Assembly Election check details 06 November 2022.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x