26 September 2020 7:39 PM
अँप डाउनलोड

आसाममधील भाजप सरकार संकटात; सहयोगी पक्षातील कार्यकर्त्यांना मारहाण महागात?

Tripura, BJP

त्रिपुरा: भाजपचे आसाममधील सरकारची सत्ता धोक्यात आली आहे. कारण भाजपचा सहयोगी पक्ष आयपीएफटी’ने भाजपवर आरोप करताना थेट दुसरा पर्याय शोधण्याची धमकी देत एकप्रकारे सरकार अल्पमतात आणण्याची धमकी भाजपाला दिली आहे. विशेष करून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने आसाममध्ये आयपीएफटी’च्या कार्यकर्त्यांचा तसेच पदाधिकाऱ्यांचा मानसिक छळ आणि त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा गंभीर आरोप केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आयपीएफटी’चे प्रवक्ते मंगल देबवर्मा यांनी जाहीर पत्रकार परिषद आयोजित करून भाजपाला सदर प्रकरणावरून गंभीर इशारा दिला आहे. भाजपच्या नेत्यांना तसेच मंत्र्यांनी संबंधित विषयाची माहिती देऊन देखील त्याची दाखल घेतली जात नसून, उलट हल्ल्यांचे प्रमाण अधिकच वाढल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून भाजप स्वतःच्या मित्र पक्षांच्या विरोधातच राजकारण खेळत असून ते जाणीवपूर्वक सहकारी पक्षांना संपवण्यासाठी कार्यकर्त्यांना लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, जर भाजपने या विषयाची गंभीर दखल घेतली नाही तर थेट पाठिंबा काढण्याची धमकी दिली असून, त्यांनी दुसरा पर्याय शोधण्याच्या पर्याय खुला असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ सदर विषय कसा हाताळणार ते पाहावं लागणार आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(240)#Narendra Modi(1318)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x