11 August 2022 9:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | बाईकवर बसलेल्या चिमुकल्याला गाडीने चिरडण्याचा भीषण प्रयत्न, पण बापाने जे केलं ते चमत्कारिक, पहा व्हिडिओ Mutual Funds | दररोज फक्त 333 रुपये गुंतवून कमवा 6 लाख रुपयांचा भरघोस परतावा, हा म्युच्युअल फंड करेल करोडपती Viral Video | सुसंस्कृत चोर बघितला का?, देवीला हात जोडून नमस्कार केला, नंतर दानपेटी घेऊन फरार, व्हायरल व्हिडिओ पहा Viral Video | पायऱ्यांवर एकदा पडला, लगेच कपडे बदलून आला आणि पुन्हा काय झालं त्याचा व्हायरल व्हिडिओ पहा Horoscope Today | 12 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI PPF Account | SBI मध्ये PPF खाते उघडताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, आर्थिक नुकसान टाळून फायद्यात राहा Lucky Numbers | या तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी 12 ऑगस्टचा दिवस वरदान, नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग
x

लॉक-अनलॉक'मुळे महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज

NCP, Congress, Shivsena, Unhappy in Mahavikas Aghadi

मुंबई, 2 जुलै : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये लॉकडाऊन वाढवल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा अंतर्गत धुसफूस आणि नाराजीनाट्य सुरू झालं आहे. अद्याप महाविकास आघाडीचा कुठलाही नेता अधिकृतपणे या विषयी बोललेला नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीसुद्धा त्यांच्यात सूर मिसळल्याची सूत्रांची माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विश्वासात न घेता निर्णय घेतात, अशी तक्रार काही नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे. आता शरद पवार यासंदर्भात उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची शक्यता आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत राजकीय मतभेद निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. आता आघाडीत बिघाडी तर होणार नाही ना अशी दबक्या सुरात चर्चा आहे.

राज्य सरकारने राज्यात पुन्हा तेच नियम कायम ठेवत मिशन बीगीन अगेनच्या दुसरा टप्पा लागू केला. पण हा निर्णय घेतांना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं म्हणणं आहे. याआधी काँग्रेस नाराज होती. निर्णय प्रक्रियेत सहभाग नसल्याचं कारण देत त्यांनी नाराजी व्यक्त केली होता. त्यामुळे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. महाविकास आघाडीच्या सरकारला आता 7 महिने झाले आहेत. पण यादरम्यान अनेकदा नाराजी समोर आली आहे.

 

News English Summary: Some leaders have complained to NCP’s Sharad Pawar that Chief Minister Uddhav Thackeray takes decisions without trust. Now Sharad Pawar is likely to meet Uddhav Thackeray in this regard. In Maharashtra, political differences have started to form in the Mahavikas Aghadi.

News English Title: NCP and Congress party ministers unhappy in Mahavikas Aghadi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x