23 April 2024 11:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा EPF Money Withdrawal | पगारदारांनो! EPF खात्यातून पैसे काढल्यावरही टॅक्स भरावा लागणार, कधी आणि किती ते लक्षात ठेवा Numerology Horoscope | 23 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 23 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

आपापसात मारामाऱ्या करा, पण लोकांची कामं करा, फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला

Opposition leader Devendra Fadnavis, Mahavikas Aaghadi

नवी दिल्ली, १७ जुलै : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज एकदिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी काही केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही दिल्लीत भेट घेतली. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील कोरोनाची परिस्थिती अमित शहा यांच्या कानावर घातली आहे. तसंच या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दलही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, मदन भोसले आणि आमदार जयकमार गोरे यांच्यासह देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहेत. साखर कारखान्यांचे प्रश्न आणि राज्याच्या राजकीय परिस्थितीबाबत हायकमांडशी चर्चा करण्यासाठी ते दिल्लीत गेल्याचं सांगण्यात येतंय. दिल्लीवारीत त्यांनी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची सुद्धा भेट घेतल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे. महा जॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसनं शिवसेना-राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून फडणवीस यांनी चिमटा काढला असून, “आपापसात मारामाऱ्या करा, पण लोकांची कामं करा,” असा टोला फडणवीस यांनी लगावला.

तत्पूर्वी, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुढाकारातून नगरच्या विळद घाटातील त्यांच्या संस्थेत साखर कारखान्यांचा प्रश्न सोडवण्यासाठीची बैठक झाली होती. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील साखर उद्योगाशी संबंधित भाजपचे नेते हजर होते. करोनामुळे उद्भवलेल्या संकटात केंद्र सरकारकडून साखर उद्योगाला काय मदत करता येईल, यासंबीधीची चर्चा करून केंद्राला प्रस्ताव देण्याचे प्राथमिक नियोजन नगरच्या बैठकीत करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईत बैठक घेऊन अंतिम स्वरूप देऊन केंद्र सरकारकडे जाण्याचे नियोजन होते. त्यानुसार आज ही मंडळी दिल्लीत गेली असावी, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

 

News English Summary: Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis is on a one-day visit to Delhi today. It is learned that he met some Union ministers and party leaders today. Devendra Fadnavis also met Union Home Minister Amit Shah in Delhi.

News English Title: Opposition leader Devendra Fadnavis Slam To Mahavikas Aaghadi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x