2 May 2024 8:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

आम्हाला महाविकास आघाडी सरकार पाडण्यात कुठलाही रस नाही - फडणवीस

Union Home Minister Amit Shah, Devendra Fadnavis

नवी दिल्ली, १७ जुलै : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती. आम्हाला सरकार पाडण्यात काहीही कुठलाही रस नाही. आत्ता कोरोनाची लढाई सुरु आहे. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही भेट होती. महाराष्ट्रातली कोरोनाची परिस्थिती मी अमित शाह यांच्या कानावर घातली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळाल्यास त्यांनाही महाराष्ट्रातली परिस्थिती सांगणार आहे. सध्या राज्यात काय चाललं आहे.. काय झालं पाहिजे यावर त्यांच्याशी चर्चा करणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे. महा जॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसनं शिवसेना-राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून फडणवीस यांनी चिमटा काढला असून, “आपापसात मारामाऱ्या करा, पण लोकांची कामं करा,” असा टोला फडणवीस यांनी लगावला.

 

News English Summary: Former Maharashtra Chief Minister and Leader of Opposition in the Legislative Assembly Devendra Fadnavis visited Delhi and met Union Home Minister Amit Shah. The visit was not political. We have no interest in overthrowing the government.

News English Title: Union Home Minister Amit Shah And My Meet Is Not Political Says Devendra Fadnavis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x