13 July 2020 5:57 AM
अँप डाउनलोड

'त्या' प्रश्नावर पुन्हा संधी मिळाली आणि फडणवीस म्हणाले ‘मी पुन्हा येईन!

Pimpri Interview, Opposition Leader Devendra Fadanvis

पिंपरी: मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच त्याच विधानाचा पुनरुच्चार करून विधानसभा निवडणूक लढविली. निकालानंतर ते पुन्हा आले पण अल्पावधीतच त्यांचे सरकार कोसळले.. आणि महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करून फडणवीस यांचे मी पुन्हा येईन”चे स्वप्न वास्तविकदृष्ट्या भंग पावले. मात्र तरीही त्यांनी चिंचवड येथे एका कार्यक्रमात मी पुन्हा येईन, पण…असे म्हणून सर्वांचीच उत्सुकता वाढविली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात पार पडली. त्याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात एक कविता सादर केली होती. ज्यामध्ये ते मी पुन्हा य़ेईन असं म्हटले होते. त्यानंतर निवडणुकीचा प्रचार सुरु झाला तेव्हा त्या प्रचारादरम्यानही अत्यंत आक्रमकपणे देवेंद्र फडणवीस यांनी हे वाक्य अनेकदा भाषणानंतर वापरलं. हे वाक्य त्यांच्या निवडणूक प्रचाराचा अविभाज्य भागच झालं होतं. मात्र देवेंद्र फडणवीस हे सत्तेवर येऊ शकले नाहीत.

तुम्हीच आमचे आजीव मुख्यमंत्री आहात, यापुढेही तुम्हीच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते, असे एक विद्यार्थी म्हणाला, तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचे मार्गदर्शन लाभले, ते यापुढेही लाभावे पुढच्या वेळी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून या कार्यक्रमाला यावे, असे एक विद्यार्थी म्हणाला. त्यावर फडणवीस म्हणाले, या वेळी फक्त इतकेच सांगतो की, मी पुन्हा येईन पण, या त्यांच्या उत्तराने प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं म्हणजेच महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा राज्यात स्थापन झालं तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची यथेच्छ खिल्लीही उडवली. मात्र फडणवीस यांनी त्यांना वेळोवेळी प्रत्युत्तरंही दिली.

 

Web Title: Opposition Leader Devendra Fadanvis says I will come again in Pimpri Interview.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(453)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x