7 May 2021 9:56 AM
अँप डाउनलोड

तर रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आम्ही रुग्णालयांना सुजय विखे-पाटील यांचाच नंबर दिला असता - जयंत पाटील

Remdesivir injection

पुणे, २७ एप्रिल | आम्हाला आधी कळालं असतं तर रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आम्ही रुग्णालयांना सुजय विखे-पाटील यांचाच नंबर दिला असता, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. हा प्रकार अतिश्य गंभीर आहे. औरंगाबाद उच्च न्यायालायने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. लोकप्रतिनिधी इंजेक्शन्स घेऊन बसायला लागले आणि त्यांचे वाटप करत असतील तर वैद्यकीय यंत्रणांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळण्यात अडथळे येतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सुजय विखे-पाटील यांच्याकडून करण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वादग्रस्त खरेदीवर भाष्य करण्यात आले. आम्हाला आधी कळलं असतं तर आम्ही रेमडेविसिरची गरज असलेले रुग्ण आणि डॉक्टरांना सुजय विखेंचा नंबर दिला असता. मात्र, अशाप्रकारे राजकीय हेतूने काम करणे योग्य नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर खोचक टीका करताना त्यांनी एकतर राजधानी पुण्यात हलवून इथून कामकाज करावं किंवा पुण्याचे पालकमंत्री तरी बदलावेत, अशी खोचक टीका केली होती. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या कामाचं कौतुक करत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

“अजित पवार यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात करोनाच्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्याचं काम अजित पवार करत आहेत. पुण्यावरही अजित पवारांचं लक्ष आहे. काही प्रश्न निर्माण झाला तर अजित पवार उपलब्ध असतात आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. अजित पवारांनी पुण्यात येऊन अनेकदा बैठक घेतली आहे. पिंपरीत जाऊन पाहणीही केली आहे. काहीतरी बोलायचं म्हणून चंद्रकांत पाटील बोलत असतात,” अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

 

News English Summary: So we would have given Sujay Vikhe-Patil’s number to the hospitals to get Remedicivir injections  said minister Jayant Patil.

News English Title: Minister Jayant Patil criticized BJP MP Sujay Vikhe Patil over Remdesivir injection politics news updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x