25 April 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
x

भाजपच्या मेळाव्यात महिला कार्यकर्त्यांच्या साड्यांचे पदर ओढले व चिमटे काढले; तक्रारींवर वरिष्ठ म्हणाले?

Minister Chandrakant Patil, BJP Pune, BJP Maharashtra, BJP Female Workers, BJP Womens Workers

पुणे : काही दिवसांपूर्वी भाजपशी संबंधित नेत्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कालच्या पुण्यातील मेळाव्यातील प्रकारामुळे भाजपमध्ये असे किती लोकं अजून आहेत, जे महिलांसाठी धोकादायक आहेत. कारण स्वतः भाजपच्या महिलांनी रागाने पक्षाच्या ग्रुपवर मेसेज टाकून तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान घडलेल्या धक्कादायक प्रकाराबद्दल जेव्हा संबंधित महिला पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली तेव्हा, ‘जावू दया सोडून दया. पत्रकार आहेत इथं. उगीच विषय वाढेल. पक्षाचे नाव जाईल असे सांगितले गेले’. सदर घटनेने संबधित महिला हादरून गेल्या असल्या तरी वरिष्ठांनी प्रकरण मिटवण्यासाठी शक्ती पणाला लावल्याचं वृत्त आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी पुण्यात भारतीय जनता पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमच्यासोबत छेडछाड झाली, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसंच हे प्रकरण बाहेर येऊ नये, यासाठी देखील काहींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित महिला पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटलांना भेटण्यासाठी गेलो असता काही लोकांकडून प्रचंड गर्दीचा फायदा घेऊन महिला पदाधिकाऱ्यांच्या साड्यांचे पदर ओढणे, चिमटे काढणे असे घृणास्पद प्रकार घडल्याचा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केल्याने खळबळ माजली आहे. तक्रार केल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी बाहेर उपस्थित असल्याने सदर प्रकरणाची तक्रार करून देखील ते जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रकार घडल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे.

भाजपच्या या मेळाव्यात ज्या महिला पदाधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप आहे, त्यांनी समाज माध्यमांवर याबाबत पोस्ट लिहीत झाल्या प्रकाराबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यातील हा प्रकार आता चव्हाट्यावर आला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमातच हा प्रकार घडल्यानंतरही कुणावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्यांवर भारतीय जनता पक्षाकडून कारवाई करण्यात येणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे सदर गंभीर विषय आपले स्थानिक आमदार आणि सरचिटणीस बाबाशेठ यांच्या कानापर्यंत जावा आणि आपल्या मतदारसंघात महिलांची योग्य दखल घेतलीच पाहिजे असं या महिलांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x