15 December 2024 5:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

आम्ही कॉंग्रेससोबत आघाडीला तयार; पण आघाडीत राष्ट्रवादी नको: वंचितची अट

VBA, Vanchit Bahujan Aghadi, MIM, Prakash Ambedkar, Congress, NCP, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित आघाडीची जोरदार चर्चा रंगली आणि त्यांच्यामुळे काँग्रेसचे किती नुकसान झाले याची आकडेवारी समोर आली. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी तब्बल ४० लाखांहून अधिक मतं घेतल्याचे पाहायला मिळाले. वंचित आघाडीच्या उमेद्वारांमुळे लोकसभेत काँग्रेसच्या तब्बल ८ जागा पडल्या होत्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने वंचित आघाडीला सोबत घेण्याच्या जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही कॉंग्रेस आघाडीत येण्यास तयार आहोत, परंतु त्या आघाडीत एनसीपी नसायला हवी, अशी अटच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने टाकली असल्याचे समोर आले आहे. आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, सर्व पक्षांनी मोर्चेबंधानीला सुरवात केली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार पुन्हा सत्ता स्थापन करू नये यासाठी विरोधकांकडून समविचारी पक्षांना एकत्रित आणण्याचे काम सुरु आहे.

कॉंग्रेस- एनसीपी आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे कॉंग्रेस व एनसीपीच्या आघाडीला चांगलाच फटका बसला आहे. दरम्यान तोच फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू नये म्हणून कॉंग्रेस आघाडी वंचितला आघाडीत घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे.

कॉंग्रेस आणि एनसीपी आघाडीने वंचित बहुजन आघाडीला आघाडीत येण्यासाठी प्रस्तावही पाठवला आहे. दरम्यान वंचित आघाडीने कॉंग्रेस समोर अशक्य अशी अट टाकली आहे. कॉंग्रेस आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेस नसली तरचं आम्ही कॉंग्रेस सोबत येऊ अशी अट वंचित आघाडीने टाकली असल्याचे समोर आले आहे. आम्ही कॉंग्रेस सोबत येण्यास तयार आहोत, परंतु कॉंग्रेसच्या आघाडीत एनसीपी नसायला हवी असे वंचित बहुजन आघाडीने म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर कॉंग्रेस सोबत आघाडी झाल्यास ५० टक्के जागांवर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचेही वंचित आघाडीने म्हंटले असल्याचेही वृत्त आहे.

मात्र असं असलं तरी विधानसभा निवडणुकीच्या निमीत्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आणि आजी-माजी आमदार भारतीय जनता पक्षापेक्षा वंचित आघाडीत प्रवेश करणं पसंत करत असल्याने भाजपाची आणि त्यासोबत काँग्रेस-एनसीपीची देखील डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. लोकसभा निवडणुकीत पहिल्यादाच वंचित बहुजन आघाडीने सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस वंचितनं राज्यभरात आपलं जाळं पसरवलं. वंचित बहुजन आघाडी ही नॉन हिंदू विचारधारेची असल्यामुळे हिंदूंचा पुरस्करता या आघाडीकडे भटकणार नाही, परंतू पुरोगामी विचारांचं लेबल असणारी कॉंग्रेस एनसीपीच्या नेत्यांनी वंचितकडे धाव घेणे सहज शक्य आहे.

दरम्यान सामाजिक कामात अग्रेसर असलेल्यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगतांनाच अऩेक राजकीय पक्षाचे नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा अण्णाराव पाटील यांनी यावेळी केला होता. राज्यातील ३६ जिल्ह्यात आमचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. आमचे नेटवर्क तयार झाले आहे. वंचितांना न्याय देण्याची भूमिका राज्यातील जनतेला पटली आहे. विषमता नष्ट करून समानता आणण्याचा आमचा विचार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी प्रसार माध्यमांना याआधीच बोलून दाखवला होता.

हॅशटॅग्स

#MIM(30)#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x