14 December 2024 1:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

युती पुन्हा नाजूक वळणावर; शिवसेनेकडून देखील स्वबळाची चाचपणी सुरू? सविस्तर

Maharashtra Assembly Election 2019, Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Aaditya Thackeray, Shivsena, BJP Maharashtra

मुंबई : लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत मनसुबे भलतेच असू शकतात याची शिवसेनेला देखील पूर्व कल्पना असणार. त्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश देखील मोदीमुळेच आहे असं भाजपचे अनेक नेते पडद्याआड बोलून दाखवत आहेत, तर शिवसेनेचे अनेक खासदार देखील ते पाठीमागे मान्य करतात.

त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेने आदित्य ठाकरे यांची ‘जण आशीर्वाद’ यात्रा सुरु केली आहे, ज्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. भाजपचा इतर राज्यातील अनुभव पाहता ते सहकारी पक्षालाच एकाकी पाडून आयत्यावेळी धाडसी निर्णय घेतात. लोकसभेच्या निकालानंतर तीच अवस्था बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याबाबतीत पाहायला मिळाली. मात्र तेथे लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाल्याने जेडीयू’च्या बाबतीत आयत्यावेळी भाजपाला काही करण्यास संधी मिळावी नव्हती.

महाराष्ट्रात विधानसभा लोकसभेसोबत झाली नाही, मात्र निकालानंतर भाजपने देशभर मोठी मुसंडी मारली. कॉग्रेस पक्ष लोकसभेत जवळपास शून्य झाला असून आगामी विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या सभा देखील कुचकामी ठरणार हे भाजपाला माहित आहे. त्यामुळे प्रचारात काँग्रेसकडे नैर्तृत्वच नाही अशी परिस्थिती आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना जवळ केल्याने २०२४ मध्ये शिवसेनेचा दिल्लीतील पर्याय भाजपने शोधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती.

दरम्यान पुढचा मुख्यमंत्री कोण असणार, यावरून शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये कलगितुरा रंगला आहे. तर दुसरीकडे युती होणार असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाची मंडळी करीत असली तरी मागचा अनुभव लक्षात घेता सावध झालेल्या शिवसेनेने यावेळी स्वबळाची चाचपणी सुरू केल्याची माहिती पुढे येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रायगडमधील शिवसेनेच्या पदाधीकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर घेतली होती. रायगडपाठोपाठ मंगळवारी पालघर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर पाचारण करण्यात आले होते.

पालघर जिल्ह्यात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ असून ६ पैकी केवळ पालघरमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. तर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे एकूण ३ आमदार आहेत. पालघरमधून यावेळी दिवंगत नेते चिंतामन वनगा यांचे पूत्र श्रीनिवास वनगा यांना तिकिट देण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण, त्यांना विधानपरिषदेवर पाठविण्यात येणार असल्याचेही आता बोलले जात आहे. खासदारकीपाठोपाठ आता आमदारकीचे तिकिटही त्यांना मिळण्याची शक्‍यता धुसर बनली आहे. तसेच एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना पक्षातर्फे नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरविण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू असल्याचेही वृत्त आहे.

तर दुसरीकडे, जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मुंबईत परतले आहेत. मागील आठवडयात जनआशीर्वाद यात्रेला मिळालेला प्रतिसाद, आगामी काळातील तयारी यावर ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि वडिल उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे.

आदित्य यांच्या प्रवासाचा पहिला टप्पा शिवसेनेचे खासदार संजय राउत यांच्या कार्यक्षेत्रात होता. ते ज्या जिल्हयांचे संपर्कप्रमुख आहेत त्याच जिल्हयात पहिल्या टप्प्यात प्रवास झाल्याने यात्रेला आक्रमक रूप प्राप्त झाले. आदित्य हे राज्याचे नेतृत्व करू शकतात, ते भावी मुख्यमंत्री आहेत, शिवसेनेला अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्रीपद मिळणार आहे, असे आक्रमकपणे मांडण्यात आल्याने भारतीय जनता पक्षात काहीशी अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे सेनेचे मनसुबे देखील वेगळेच असल्याचं भारतीय जनता पक्षाला वाटत आहे. त्यामुळे कोणतीही वाच्यता न करत दोन्ही पक्ष स्वबळाच्या तयारीला लागले आहेत असं वृत्त आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x