16 April 2024 5:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

कर्जमाफीच्या 'त्या' घोषणेवर चंद्रकांतदादा म्हणाले 'हे आमच्या आंदोलनाचं यश'

Story farmers loan waiver, Mahavikas aghadi, BJP State President Chandrakant Patil

मुंबई: शेरोशायरी, कविता म्हणत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. पहिल्याच अर्थसंकल्पात अजित पवार यांनी विविध घोषणांचा पाऊस पाडला. शेतकरी, बेरोजगार, उद्योग, शहरी-ग्रामीण, पर्यटन, वैद्यकीय आदी क्षेत्रांसह समाजातील सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरुन दिसतो. अजित पवार यांनी केलेल्या काही घोषणा या जुन्याच होत्या. त्या घोषणांचा आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात पुन्हा उल्लेख करण्यात आला. एकंदर या अर्थसंकल्पात राज्यातील प्रत्येकाला काहीना काही देण्याचा प्रयत्न केला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

सरकारने २ लाखांपर्यंतचे शेतकरी कर्जमाफी केली आहे. अर्थसंकल्पात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा दिला आहे. प्रति शेतकरी ५० हजार रुपये प्रोत्साहनपर निधी दिला जाणार आहे. त्याचबरोबर २ लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या खर्चातून मदत केली. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आम्ही अटी नियमांशिवाय उभे करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

याच विषयाला अनुसरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या धरणे आंदोलनामुळे खडबडून जागे झालेल्या महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात केली. त्यामुळे आमच्या आंदोलनाचा अर्धा विजय झाला आहे.

दुसऱ्या बाजूला फडणवीस म्हणाले, दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. आम्ही दीड लाखाच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी अशाच प्रकारची घोषणा केली. त्यावेळी आमच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. पण आता हीच घोषणा सरकारने केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बांधावर जाऊन हेक्टरी २५ हजार, ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. सरकारला सत्तेच वचन लक्षात आहे पण शेतकऱ्यांना विसरले” अशी टीका फडणवीस यांनी केली.

 

News English Summery: The government has waived loans of up to 2 lakh farmers. The budget has also provided comfort to the farmers who regularly pay their loans. An incentive fund of Rs 3,000 per farmer will be provided. The government has also decided to provide relief to farmers with more than 2 lakh loans. Instead of waiting for the help of the Center, the state government provided assistance at its own expense. We are trying to raise the farmers who are in distress without conditions, ”Ajit Pawar said. Following the same issue, BJP state president Chandrakant Patil said that the state government, led by the Bharatiya Janata Party, was awakened by the dharna agitation, and announced that the state government should provide 50,000 rupees incentive funds to farmers who regularly pay their debt. So half of our agitation has been won.

 

Web News Title: Story farmers loan waiver is success of BJP Protest against Mahavikas aghadi says BJP State President Chandrakant Patil.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x