14 December 2024 8:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न

Ashadhi Ekadashi, Pandharpur Mahapuja, CM Uddhav Thackeray

पंढरपूर, १ जुलै : आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. आज पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी ही महापूजा पार पडली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना यंदा मानाचे वारकरी म्हणून मान मिळाला. दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिराचा गाभारा फुलांनी सुंदर सजवण्यात आला आहे.

कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला, त्यानंतर मंदिर परिसरातील स्कायवाक व इतर कामासाठी मंजुरी द्यावी अशी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाचे संकट दूर कर, आनंदी, निरोगी राहू दे असे साकडे घातले. मला अशा संकटाच्या काळात विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळेल असे कधीच वाटले नव्हते अशी खंत ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

 

News English Summary: On the occasion of Ashadi Ekadashi, the official Maha Puja of Vitthal-Rukmini was performed by Chief Minister Uddhav Thackeray and his wife Rashmi Thackeray at Pandharpur this morning. Environment Minister Aditya Thackeray was also present on the occasion. This Maha Puja was performed at 3:40 am today.

News English Title: Ashadhi Ekadashi Pandharpur Mahapuja by the Chief Minister Uddhav Thackeray News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x