15 June 2021 9:07 PM
अँप डाउनलोड

फडणवीस गेले अन संवेदनशील गृहमंत्री येताच बंदोबस्तावरील पोलिसांना आयुक्तालयातर्फे १० रु. थाळी

10 Rupee Lunch, Shivsena, Nagpur Police, Nagpur Winter Session

नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनात बंदोबस्तासाठी राज्यभरातून आलेल्या पोलिसांच्या जेवणाचा बंदोबस्त गृहखात्या अंतर्गत येणाऱ्या नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाने केला आहे. गोंडराजाचा पुतळा असलेल्या विधानसभा चौकात पोलिसांनी बुफे पद्धतीने जेवण वितरीत केले. हे जेवण अवघ्या १० रुपयात सर्व पोलिसांना देण्यात आले. जेवणाचा दर्जा कसा काय आहे हे पाहण्यासाठी खुद्द पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय जातीने हजर होते. त्यांनी पदार्थांची चव चाखून समाधान व्यक्त केले. त्यांनी स्वत: पोलिसांना जेवण वाढले देखील.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जाहीरनाम्यात शिवसेनेने १० रुपयात थाळीची घोषणा केली होती. दरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्रीही झाला, परंतु अद्याप १० रुपयांच्या थाळीचं आश्वासन सामान्यांच्या बाबतीत पूर्ण झालंनसलं तरी आधीचे गृहमंत्री गेल्यानंतर स्थानिक आयुक्तालयांनी पूर्ण होणं बाकी आहे. असं असलं तरी शिवसेनेच्या आश्वासन पूर्तीआधीच नागपूरमध्ये गृहखात्यान्तर्गत येणाऱ्या आयुक्तालयांनी १० रुपयांमध्ये जेवणाची थाळी देण्याच्या मागण्यांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे यापूर्वीचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा कालावधी संपताच ५ रुपये थाळीची घोषणा केली होती, मात्र पद असताना त्याचा उपयोग कधीची किमान पोलिसांसाठी राबवून स्थानिक शहर आयुक्तांना तसे आदेश देण्याचा मोठेपणा दाखवलं नव्हता जो आता आयुक्त स्वतःच घेत आहेत, कारण सरकारमध्ये नवे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री विराजमान झाले आहेत.

 

Web Title:  Nagpur Winter Session 2019 Police Got Lunch only in 10 Rupees

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(68)#UddhavThackeray(386)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x