11 December 2024 11:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

नवनीत राणा आणि रवी राणा मुस्लिम धर्मियांच्या दर्ग्यात प्रथा पाळतात आणि आमच्या हिंदूं प्रथांचा अपमान करतात, नेटिझन्सचा संताप

MP Navneet Rana

MP Navneet Rana | ठाकरे सरकार सत्तेत असताना राणा दाम्पत्याने मुंबईत मातोश्रीच्या आवारात जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा राजकीय स्टंट केला होता. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे दोन्ही ड्रामेबाज नेते म्हणून आता महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले आहेत. दोघा ड्रामेबाज नेत्यांचा पक्ष भाजपात विलीन करून भाजपच्या तिकिटावर आगामी निवडणुका लढवायच्या असल्याने त्या स्वतःच्या फिल्मी हिंदुत्वाच्या नावाने नवनवीन ड्रामे करत असतात हे आता सर्वश्रुत झाले आहे. आपण जी स्टंटबाजी करतो ती लोकांना कळत नाही असं दोघा पत्नी-पत्नीला वाटू लागलं अशी चर्चा आता समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.

आता पुन्हा एकदा गणेश विर्सजनाच्या व्हिडिओवरून चर्चेत आले आहेत. बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करताना या राणा दाम्पत्याने मूर्ती थेट पाण्यातच फेकल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यानंतर त्यांच्यावर हे कसले हिंदू अशी टीका सुरु झाली आहे. तसेच समाज माध्यमांवर या स्टंटबाज पती पत्नीचा खरा चेहरा समोर आणण्यास सुरुवात झाली आहे.

त्याच अनुषंगाने, एका बाजूला विसर्जनावेळी राणा दाम्पत्याने कोणत्याही हिंदू धर्माच्या प्रथा न पाळता गणपती बाप्पाची मूर्ती थेट पाण्यात फेकून दिलेली असताना, दुसरीकडे नवनीत राणा आणि रवी राणा हे पति-पत्नी मुस्लिम दर्ग्यात प्रथा अगदी काटेकोरपणे पाळतात आणि त्याचे फोटो आता समाज माध्यमांवर शेअर करण्यास सुरुवात झाली आहे.

दर्ग्यातील फोटो समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल :
नवनीत राणा आणि रवी राणा यांचा राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्यातील फोटो समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतं आहेत. तसेच नवनीत राणा आणि रवी राणा मुस्लिम धर्मियांच्या दर्ग्यात जाऊन कसले पठण करतात असा प्रतिप्रश्न नेटिझन्स समाज माध्यमांवर उपस्थित करत आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा यांचे हिंदुत्व हे बोगस असल्याने त्या मुस्लिम धर्मियांच्या दर्ग्यात मुस्लिम धर्माच्या प्रथा पाळतात आणि दुसरीकडे विसर्जनावेळी हिंदू धर्माच्या कोणत्याही प्रथा न पाळता गणपती बाप्पाची मूर्ती थेट पाण्यात फेकून देतात असं आरोप समाज माध्यमांवर हा फोटो शेअर करत होऊ लागला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MP Navneet Rana with MLA Ravi Rana over Ganesh Visarjan check details 11 September 2022.

हॅशटॅग्स

#MP Navneet Rana(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x