16 April 2024 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, हे टॉप 3 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढेल Suzlon Share Price | 1 वर्षात 416% परतावा देणारा शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Quant Mutual Fund | पगारदारांनो! महिना 1100 रुपयांची SIP बचत देईल 20 लाख रुपये, खास योजना सेव्ह करा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना 5,000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर देईल रु. 3,56,829 देईल Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 16 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Man Infra Share Price | शेअर असावा तर असा! गुंतवणूकदारांना दिला 1900% परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
x

सुशांत प्रकरणाचा वापर महाराष्ट्र व बिहार दरम्यान वाद निर्माण करण्यासासाठी करू नका - उद्धव ठाकरे

Sushant Singh Rajput Suicide, Bihar, CM Uddhav Thackeray

मुंबई, १ जुलै : छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारा सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. सुशांतच्या आत्महत्ये मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर काहींनी सुशांतची हत्या केल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली आहे. आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत अनेकांचा जबाब नोंदवला गेला आहे. याच दरम्यान सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहेत. जर कोणाकडेही कोणते पुरावे असतील तर त्यांनी ते आमच्याकडे सोपवावे. कोणीही या प्रकरणाचं राजकारण करू नये असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. “जर कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे सोपवावे. आम्ही दोषींची चौकशी करून त्यांना शिक्षा करू. मात्र या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांदरम्यान वाद उत्पन्न करण्यासासाठी करू नका” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावर आत्तापर्यंत बॉलिवूडमधील घराणेशाही, काही मोठी नावं आणि त्यांच्यावर केले जाणारे आरोप यांचीच चर्चा होती. काही दिवसांपूर्वी सुशांतच्या वडिलांनी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीवरच त्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप केल्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाली. आणि आता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला एक नवंच राजकीय वळण मिळालं आहे. राज्यातल्या विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सुशांत प्रकरणात सत्तेमधल्या एका तरूण मंत्र्याचा समावेश असल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर आता खुद्द सत्तेतल्या एका वरिष्ठ मंत्र्यानेच सवाल उपस्थित केला आहे. राज्यात परिवहन मंत्री असलेले आणि शिवसेनेचे निष्ठावंत नेते अनिल परब यांनी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत पोलिसांना निष्पक्ष तपास करण्याचा सल्ला दिला आहे.

ज्यांच्याकडे या प्रकरणाबद्दल माहिती आहे, त्यांनी तात्काळ ती माहिती मुंबई पोलिसांना द्यावी. माझे पोलिसांना देखील आवाहन आहे की त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी’, असं अनिल परब यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. वरवर पाहाता त्यांनी मुंबई पोलिसांवर विश्वास दाखवला असला, तरी ‘निष्पक्ष चौकशी’ आणि ‘सुशांतच्या घरी लॉकडाऊनमध्ये पार्टी कशी झाली, त्याला कोण कोण उपस्थित होतं?’ असा उल्लेख करून त्यांनी आपलं खरं मत व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.

 

News English Summary: We will investigate the culprits and punish them. However, do not use this issue to create a dispute between Maharashtra and Bihar, “said CM Uddhav Thackeray.

News English Title: Sushant Singh Rajput Suicide dont use Sushant Singh Rajput case as tool to friction between Maharashtra Bihar said uddhav thackeray News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x