15 December 2024 8:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

नाहीतर आत्महत्याग्रस्त शेतकरी भावाच्या अस्थी ‘मातोश्री’वर पाठवणार: शेतकरी कुटुंबीय

Shivsena, Udhav Thackeray

उस्मानाबाद : भावाने आत्महत्या करुन ४ दिवस झाले. मात्र अजून देखील पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीस अधीक्षकांना देखील निवेदन देऊन आलो. परंतु, सगळ्यांना लोकसभा निवडणूक महत्वाची वाटते. जर सदर प्रकरणी पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही, तर भावाच्या अस्थी थेट मातोश्रीवर आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार, असा गर्भित इशाराच उस्मानाबादमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदार संघात प्रचाराचा धुरळा उडत असताना शेतकरी आत्महत्येची ही घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी जाहीर प्रचारसभा झाल्या. परंतु, त्यांनी या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची साधी सदिच्छा भेट देखील घेतली नाही. याविषयी बोलताना राज ढवळे म्हणाले, आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदवला नाही. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह पोलीस स्टेशनसमोर ठेवण्याचा सल्ला नातेवाईकांनी दिला होता. परंतु, सध्या लोकसभा निवडणुकीचा काळ असल्यामुळे अधिकाऱ्यांना त्रास नको म्हणून आम्ही थोडं सबूरीनं घेतलं. परंतु, मागील ४ दिवस पोलीस स्टेशनमध्ये फेऱ्या मारून देखील कोणतीही दखल घेतली जात नाही.

याप्रकरणी सोमवारी उस्मानाबाद पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कारवाई करण्याची विनंती केली आहे. तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांनी संबधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्यास तातडीने कारवाई होऊ शकते. येत्या काही दिवसांमध्ये कोणतीच कारवाई झाली नाही, तर भावाच्या अस्थी पोलीस स्टेशनमध्ये विसर्जित करेल. तसेच उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवणार, असा इशाराच त्यांनी दिला. भावाचा जीव तर घेतलाच आहे, बदनामी कशासाठी करताय?, असा सवालही त्यांनी विचारला. माझी राजकीय भूमिका तुम्हाला माहीत असताना एवढी गलिच्छ पातळी तुमच्या जवळचे लोक गाठतील असे मला वाटले नव्हते, असेही त्यांनी म्हटले आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x