12 December 2024 8:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

राऊतांनी १२ आमदारांची काळजी करण्यापेक्षा कोरोना रुग्णांची काळजी करावी - फडणवीस

Devendra Fadnavis, MP Sanjay Raut, Saamana Newspaper

मुंबई, ५ जुलै : संजय राऊत यांनी रोखठोक सदरात लिहिलेल्या लेखावरून रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात सरकार अस्थिरेच्या चर्चेनं डोकं वर काढलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास सरकार पाडण्याची तयारी होत असल्याचा धक्कादायक दावा केला होता. सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्या आहेत, असं राऊत म्हणाले होते. या विधानावरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना सल्ला दिला आहे.

संजय राऊत यांनी १२ आमदारांची काळजी करू नये, आता कोरोना रुग्णांची काळजी करण्याची गरज आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. ज्यांना उपचार मिळत नाही, अशा कोविड रुग्णांच काय होणार? हा प्रश्न राऊत यांनी विचारला असता, तर मला जास्त आनंद झाला असता, असं फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर येथील कोरोना रुग्णांची भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते.

सामनाच्या रोखठोक या सदरातून संजय राऊत यांनी महाविकासआघाडी सरकार ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाडण्याच्या हालचाली सुरू आहेत, असा आरोप केला होता. सध्या विधानपरिषदेवरील १२ राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीवरून राज्यात पेच निर्माण झाला आहे. यापूर्वीच्या सदस्यांची मुदत १५ जूनलाच संपली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुचविलेल्या नव्या सदस्यांची निवड झाली असती तर त्यांनी कामाला सुरुवात केली असती. परंतु, सध्या या सदस्यांच्या नियुक्तीसाठी अनुकूल नसल्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत.

 

News English Summary: Sanjay Raut should not worry about 12 MLAs. They should take care of Maharashtra. They should take care of Corona patients. What will happen to corona patients who do not receive treatment? I would have been happier if he had asked such a question, ”said Devendra Fadnavis.

News English Title: Devendra Fadnavis Reaction On Shivsena MP Sanjay Raut Article News Latest updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x