आंदोलक शेतकऱ्यांची चिकाटी | अखेर अमित शहांनी बोलावली शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक
नवी दिल्ली, 08 डिसेंबर : ‘भारत बंद’ बरोबर व्यापक झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या (All India Bharat Bandh called by protestant farmers) पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Minister Amit Shah) यांनी आज सध्याकाळी ७ वाजता शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली आहे. ९ डिसेंबरला बुधवारी सरकार शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार असताना देखील अमित शहा यांनी ही तातडीची बैठक अचानक बोलावली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिकाटीपुढे सरकार झुकवणार की शेतकऱ्यांची आश्वासनांवर बोळवण होणार ते पाहावं लागणार आहे.
सदर बैठकीत तिन्ही कृषी विधेयकासंदर्भात महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत यांनी या बैठकीविषयी माहिती दिली आहे. सकाळी अमित शाह यांच्या शेतकऱ्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. ही बैठक अनौपचारिक असणार आहे. या बैठकीत १३ सदस्य गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
मागील शनिवारी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल हे शेतकरी नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत उपस्थित होते. दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या या बैठकीत शेतकरी संघटनांचे ४० प्रतिनिधी सहभागी झाले होते. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या या पाचव्या बैठकीत सुद्धा शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये पुन्हा चर्चा होणार आहे. Last Saturday, Union Agriculture Minister Narendra Singh Tomar and Commerce Minister Piyush Goyal were present at a meeting with farmers’ leaders
News English Summary: Union Home Minister Amit Shah has convened a meeting of farmers’ leaders at 7 am today on the backdrop of the All India Bharat Bandh called by protestant farmers. Even when the government will hold discussions with the farmers ‘leaders on Wednesday, December 9, Amit Shah has called an emergency meeting all of a sudden and it remains to be seen whether the government will bow to the farmers’ persistence or not.
News English Title: After aggressive protest Amit Shah calls farmers leader meeting tonight news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN