13 May 2021 1:38 AM
अँप डाउनलोड

बलात्काऱ्यांना माफ करा हे विचारायची हिंमतच कशी होते? - निर्भयाच्या आईचा संताप

Nirbhaya Rape Case

नवी दिल्ली: एकीकडे संपूर्ण देश निर्भयाच्या दोषींना फासावर कधी लटकावणार याची वाट पाहत आहे, मात्र दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. “सोनिया गांधींप्रमाणे निर्भयाच्या आईनेही दोषींना माफ करावं,” असं आवाहन इंदिरा जयसिंह यांनी केलं आहे. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी शुक्रवारी सोनिया गांधी यांचं उदाहरण देत म्हटलं होतं की त्यांनी राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफ केलं होतं, त्याचप्रमाणे निर्भयाच्या आईनेही करावं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

इंदिरा यांच्या या ट्विटला निर्भयाच्या आईने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत निर्भयाच्या आई म्हणाल्या, “दोषींना माफ करण्याचा सल्ला देणाऱ्या इंदिरा जयसिंह आहेत तरी कोण? असा सल्ला देण्याची त्यांची हिंमतच कशी होते? संपूर्ण देश दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहे असं निर्भयाच्या आईने संतप्त भावनेतून म्हटलं आहे.

दरम्यान, निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही गुन्हेगारांना आता २२ जानेवारीऐवजी १ फेब्रुवारी रोजी फासावर लटकविण्यात येणार आहे. तसे डेथ वॉरंट दिल्लीच्या कोर्टाने शुक्रवारी जारी केले. त्यानुसार, चौघांना १ फेबुवारी रोजी सकाळी ६ वाजता फासावर चढविण्यात येईल. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीशकुमार अरोरा यांनी हे डेथ वॉरंट जारी केले.

 

Web Title:  Senior advocate Indira Jaising urges Nirbhayas Mother to follow Sonia Gandhis example to forgive Convicts in the case.

हॅशटॅग्स

#RapeCase(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x