14 December 2024 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

सत्तेसाठी विरोधी पक्ष फोडून केलेली मेगाभरती भाजपाला आज चुकीची वाटतेय: सचिन सावंत

Congress spokesperson Sachin Sawant, BJP Megabharti, BJP State President Chandrakant Patil

मुंबई: विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकल्यानंतरही भारतीय जनता पक्षाला विरोधात बसावं लागल्याचं मोठं दुःख आहे. त्यात भारतीय जनता पक्षातील जुन्या जाणत्या अनेक निष्ठावंतांना पक्षात तिकीटं मिळाली नाही याचा देखील प्रचंड राग आहे. त्यामुळे खुद्द महाराष्ट्र पक्षाध्यक्षांनीच निवडणूकपूर्व मेगाभरतीला वाचा फोडल्याने भारतीय जनता पक्षातील हा सुप्त असंतोष कदाचित मोठ्या प्रमाणावर वाढीस लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे.

सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्यासाठी ‘साम,दाम,दंड,भेद वापरून सत्तेसाठी मेगाभरती केली होती. परंतु, आता त्याच भारतीय जनता पक्षाला मेगा भरती ही चूक असल्याचे वाटत असल्याचा टोला सावंत यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला. तसेच, गुंड व भ्रष्टाचारी लोकांना जमा केल्याने अत्यंत हीन पातळीवर गेलेल्या भारतीय जनता पक्षाने ‘आतातरी सुधरावे’ असा सल्ला सुद्धा यावेळी सावंत यांनी दिला. तर भारतीय जनता पक्षात गेलेले ‘घरके न घाट के’ झाले असून काँग्रेसचे मात्र त्यामुळे शुध्दीकरण झाले असल्याचा टोला त्यांनी गयारामांना लगावला.

भाजपमध्ये आयत्यावेळी प्रवेश केलेल्या नेत्यांची निकालानंतरच्या घडामोडींमुळे मोठी राजकीय कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांना २०२४च्या अनुषंगाने मतदारसंघात स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवायचे असल्यास राज्यात सत्तेत येणाऱ्या राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा शिवसेनेच्या आश्रयाला जावे लागेल अशी राजकीय अडचण निर्माण झाली आहे.

पंचायत समितीत देखील महाविकास आघाडीने भाजपाला धक्के दिल्याने स्थानिक पातळीवर स्वतःच राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी सत्ताधारी पक्षांमध्ये जाणं सोयीचं समजत आहेत. भाजपातील किमान १७ विद्यमान आमदार राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे कमित कमी पक्षातील निष्ठावंत तरी कसे जपता येतील यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे वक्तव्य केल्याचं म्हटलं जातं आहे. तसेच आयतांना पक्षात प्राधान्य देऊन मेगा भरती करणाऱ्या फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या विरुद्ध भाजपातील निष्ठावंतांचा रोष वाढू नये याची काळजी घेण्यास राज्य भाजप सरसावल्याचं म्हटलं जातं आहे आणि त्यामुळे भाजपात लवकरच नेत्यांचे महविकास आघाडीत प्रवेश करणं सुरु होणार असल्याचं वृत्त आहे.

 

Web Title:  Congress spokesperson Sachin Sawant criticizes BJP over Megabharti issue.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x