12 August 2020 11:43 AM
अँप डाउनलोड

काँग्रेसच्या अंतर्गत एक्झिट पोलमध्ये एनडीए'ला २३० तर भाजपाला २०० पेक्षा कमी जागा

Rahul Gandhi, Narendra Modi, Congress, BJP, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठीचे ७व्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांच्या संस्थांनी आपापली एक्झिट पोल जाहीर केली होती. या एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत एनडीए बहुमतापर्यंत जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने देखील एक्झिट पोल घेण्यात आले असून, या एक्झिट पोलमध्येही भाजपाप्रणित एनडीएला यूपीएपेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु भारतीय जनता पक्षाला २०० हून कमी जागा मिळतील आणि एनडीएला केवळ २३० जागांवर मजल मराटग येईल. तर काँग्रेस स्वबळावर १४० जागा जिंकेल आणि यूपीएला १९५ जागा मिळतील, असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

काँग्रेसने घेतलेल्या अंतर्गत एक्झिट पोलनुसार यूपीएला तामिळनाडू, केरळ आणि पंजाबमध्ये चांगले यश मिळेल. तसेच बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, झारखंड आणि हरियाणा या राज्यांमध्येही पक्षाची कामगिरी चांगली होणार आहे. यूपीएला बिहारमध्ये १५, महाराष्ट्रात २२ ते २५, तामिळनाडूत ३४ केरळमध्ये १५, कर्नाटकात ११ ते १३ आणि मध्य प्रदेशात ८ ते १० जागा मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

त्याशिवाय गुजरातमध्ये ७, हरियाणात ५ ते ६, छत्तीसगडमध्ये ९ आणि पूर्वोत्त राज्यांत ९ ते १० जागा मिळण्याची अपेक्षा काँग्रेसमध्ये आहे. सर्व एक्झिट पोल काँग्रेसला यूपीत केवळ २ जागा देत असले तरी या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला यूपीत ५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, दक्षिण भारतात काँग्रेस आणि एनडीएला चांगले यश मिळेल,अशी अपेक्षा या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आली आहे. विविध निवडणूक क्षेत्रांमध्ये उपस्थित असलेले २६० पर्यवेक्षक, राज्यांचे प्रभारी आणि स्थानिक नेत्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर काँग्रेसने ही आकडेवारी मिळवली आहे.

काँग्रेसच्या एक्झिट पोलमध्येही एनडीएच सर्वात मोठी आघाडी ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी एनडीएला २३० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला असून एनडीएला बहुमतासाठी ४० जागा कमी पडतील, असेही नमूद करण्यात आले आहे. तसेच भारतीय जनता पक्षाला २०० पेक्षा कमी जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Congress(395)#Rahul Gandhi(166)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x