26 September 2020 7:55 PM
अँप डाउनलोड

अंड आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा मिळावा: संजय राऊतांची मागणी

Sanjay Raut, MP Sanjay Raut, Shivsena MP sanjay Raut, Hens, Eggs, vegetarian Eggs, vegetarian Hens

नवी दिल्ली : राज्यसभेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका अजब विषयावर मत मांडत थेट आयुष मंत्रालयाकडे मागणी केली आहे. अंड आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्यावा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयुष मंत्रालयाला केली आहे. सोमवारी राऊत राज्यसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी नंदुरबार आणि हरियाणातल्या आदिवासी समाजाचे दाखले देत ही मागणी राज्यसभेत उचलून धरली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

संजय राऊत म्हणाले की, मी एकदा महाराष्ट्रातल्या नंदुरबारमध्ये गेलो होतो. नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे, तिथल्या काही आदिवासी बांधवांनी मला जेवणाचं ताट आणून दिलं. मी त्याला विचारलं काय आहे जेवणात? तर तो म्हटला ही कोंबडी आहे. मी म्हटलं मला कोंबडी नको, तर तो म्हटला ही आयुर्वेदीक कोंबडी आहे जी तुम्ही खाल्लीत तर तुमच्या शरीरात जर काही आजार असतील तर ते बरे होऊ शकतात असा दावा देखील त्याने केला. आम्ही या कोंबडीचे पालनपोषणच देखील तशा पद्धतीनेच करतो की ती आयुर्वेदीक कोंबडी म्हणूनच वाढवली आहे. आयुष मंत्रालयाने याची दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पुढे अजून एक दाखला देताना, ‘काही दिवसांपूर्वी माझ्याकडे हरीयाणा येथून काही लोक आले त्यांनी आयुर्वेदीक अंडे हा शब्द प्रयोग केला’. मी त्यांना विचारलं की अंडे आयुर्वेदीक कसे काय? तर त्यांनी सांगितले की आम्ही पोल्ट्रीतल्या कोंबड्यांना आयुर्वेदीक खाद्य देतो ज्यामध्ये लवंग, मुसली, तीळ अशा जिन्नसांचा विशेषकरून समावेश आहे. हे खाणं खाल्ल्यानंतर कोंबड्या जी अंडी देतात ती शाकाहारी आणि आयुर्वेदीक असतात असा देखील दावा त्या शेतकऱ्यांनी केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. ज्यांना प्रोटीन्सची गरज आहे आणि मांसाहार ज्यांना करायचा नाही असेही लोक हे अंडे खाऊ शकतात असाही दावा त्यांनी केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान भारतात शाकाहार आणि मांसाहार यामध्ये कमालीचे भेदभाव आहेत. त्यात अंड शाकाहारी आहे की मांसाहारी यावरून अनेकदा वाद विवाद होताना दिसतात. त्यामुळे आता संजय राऊत यांनी केलेल्या मागणीची आयुष मंत्रालय दखल घेणार का ? हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(134)#Shivsena(922)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x