19 April 2024 9:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मराठी भाषा भवनाच्या प्रश्नावर शिवसेना गप्प का : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Shivsena, Nitin Gadkari, MLA vijay vadettivar, opposition leader vijay vadettivar, marathi language

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका २ महिन्यांवर आल्या आहेत. त्याच अनुषंगाने राज्यातील विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठी भाषा भवनाच्या प्रश्नावरून सत्ताधारी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.

राज्यात मराठी अस्मितेचे राजकारण करणारी शिवसेना मराठी भाषा भवन मुंबईतच व्हावे यासाठी आग्रही असल्याचे दिसत नाही. बाकी इतरवेळी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, असा गळा शिवसेना काढत असते. मग मराठी भाषा भवनाच्या प्रश्नावर शिवसेना सत्तेत येऊन देखील गप्प का बसली आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच पुढे बोलताना सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेने मराठी भाषा भवन मुंबईबाहेर हलवू देणार नाही, यासाठी आग्रह धरला पाहिजे. मात्र शिवसेना फक्त मतांसाठी मराठीचा आणि मराठी माणसाचा वापर करते. मराठी भाषा भवनासाठी मुंबईत एक इमारत उपलब्ध करून देता येत नसेल तर शिवसेनेला मराठी-मराठी करण्याचा अधिकारच राहिलेला नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान मराठी भाषा भवन मुंबईत उभारून भाषा संचालनालय, साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था ही सर्व कार्यालये एकाच छताखाली आणणे महत्वाचे आहे असंही वडेट्टीवार म्हणाले.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x