6 May 2024 9:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Health First | गावाकडलं अस्सल कडधान्य म्हणजे कुळीथ | कुळथाचे आरोग्यासाठी फायदे - नक्की वाचा

Benefits of Kulith Horsegram

मुंबई, २९ जून | कुळीथ म्हणजे काही ठिकाणच्या बोली भाषेत ‘हुलगा’ हे भारतात सगळेकडे पिकणारे आणि सहज उपलब्ध असणारे असे कडधान्य आहे. हे कडधान्य इतके पौष्टिक आहे की त्याला सुपर फूड मानले जाते. खरे तर आपले भारतीय जेवण हे अतिशय परिपूर्ण आहार म्हणून मानले जाते पण हल्ली पाश्चात्य पद्धतीच्या आहाराच्या प्रभावामुळे आपण आपल्या पद्धतीचं सकस खाणं विसरत चाललो आहोत.

डाळी, कडधान्ये आणि द्विदल धान्ये हा खरंतर भारतीय जेवणाचा प्रमुख घटक आहे परंतु आपण जेवताना किती प्रमाणात हे खातो हयाकडे लक्ष देत नाही. खरंतर आपलं जेवण हे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटस, थोड्या प्रमाणात फॅट्स, विटामीनस् आणि मिनरलस् ह्यांनी परिपूर्ण असे आहे. रोज असे ताजे, सकस अन्न घेणे हे अतिशय आरोग्यदायी आहे.

आहारातील कडधान्यांचे महत्व सांगताना तिने विशेष महत्व कुळीथ ह्या कडधान्याला दिले. या क्षेत्रातील आहारतज्ज्ञ म्हणतात की, कुळीथ हे इतके पौष्टिक आहे की ते अक्षरशः सुपर फूड आहे. कुळीथाच्या सेवनामुळे वजन कमी होण्यास खूप मदत होते कारण कुळीथामध्ये चरबीचा निचरा करणारे गुणधर्म असतात. तसेच कुळीथाचे सेवन नियमितपणे केल्यास किडनी स्टोन होत नाही, तसेच डोळ्यांभोवती काळी वर्तुळे दिसणे किंवा शरीरावर स्ट्रेच मार्क्स दिसणे ह्याचे प्रमाण खूप कमी होते.

आरोग्य तज्ज्ञ सांगतात की कुळीथ डाळीचे सूप हे सर्दी, फ्लू किंवा मायग्रेनची डोकेदुखी ह्यावर देखील गुणकारी आहे. आहारतज्ञ असणाऱ्या पूजा मल्होत्रा सांगतात की कुळीथ प्रोटीन, लोह, कॅल्शियम, फायबर आणि फॉस्परसनी युक्त असते. त्या पुढे सांगतात की किडनी स्टोन, मूळव्याध आणि कोणत्याही प्रकारच्या अल्सरवर देखील कुळीथ गुणकारी आहे. अपचनाचा त्रास असणाऱ्या लोकांनी देखील नियमित कुळीथाचे सेवन करावे असे तज्ज्ञ सांगतात. बद्धकोष्ठता आणि स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासावर देखील कुळीथ गुणकारी आहे.

कुळथाचे इतर गुणधर्म:
१. कुळीथामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आपले शरीर निरोगी व स्वच्छ राहण्यास मदत होते.
२. कुळीथ मधुमेही व्यक्तींना उपयुक्त आहे कारण त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते आणि शरीरातील इंसुलिन देखील वाढते.
३. दमा, कावीळ, मूळव्याध आणि डोळे येणे ह्या आजारांवर देखील कुळीथ गुणकारी आहे.
४. रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास देखील कुळीथ मदत करते.
५. वजन कमी करण्यास हे उपयुक्त आहे कारण कुळीथामध्ये फॅट बर्निंग कपॅसिटी असते.

तर असे हे सुपर फूड असणारे कुळीथ. ह्याचे असंख्य गुणधर्म आहेत. त्यामुळे सर्वांनी रोजच्या आहारात ह्याचे नियमित सेवन जरूर करावे. इथे कुळीथाबाबत अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की कुळीथ हे इतर डाळी आणि कडधान्यापेक्षा बरेच स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Benefits of eating Kulith Horsegram health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x