14 November 2019 1:13 PM
अँप डाउनलोड

व्हिडिओ: जे फ्रान्सचे माजी अध्यक्ष होलँद बोलले, तोच गौप्यस्फोट राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला केला होता: सविस्तर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय ठोकताळ्याच आणि राजकीय गोटातील व्यक्तिगत संबंध उत्तम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कारण याच उत्तम संबंधामुळे त्यांना सत्ताधाऱ्यांचे धागेदोरे आणि गुपित कानावर येत असतात. सध्या फ्रान्सचे माजी अध्यक्ष होलँद यांनी राफेल लढाऊ विमानांचा करार आणि त्यात कोणताही पूर्व अनुभव नसलेल्या अनिल अंबानींच्या नवोदित कंपनीचा सहभाग यावर फ्रान्समधील एका मुलाखतीत बोट ठेवलं होतं, त्यानंतर मोदी सरकार पूर्णपणे तोंडघशी पडलं आहे. दरम्यान, त्याच राफेल करारातील घोटाळ्याचे गौडबंगाल आणि अनिल अंबानींच्या कंपनीचा सहभाग, मनसे अध्यक्षांनी आधीच म्हणजे मार्च महिन्यातील गुढीपाडव्याच्या सभेत महाराष्ट्रासमोर गौप्यस्फोट केला होता.

फ्रान्सचे माजी अध्यक्ष होलँद यांनी राफेल लढाऊ विमानांच्या करारासंबंधित बोलताना त्यांनी अनिल अंबानींच्या कंपनीबाबत बोलताना त्यात मोदी सरकारचा हात होता आणि भारत सरकारनेच त्यांचं नाव सुचवलं होत. त्यामुळेच आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर राफेल व्यवहारात घोटाळा झाल्याच उघड झालं होत. दरम्यान, या घोटाळ्याच्या आरोपानंतर संपूर्ण मोदी सरकार हादरून गेलं असून सध्या काँग्रेसकडून भाजप विरोधात रान उठविण्यात येत आहे. परंतु हाच विषय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील मार्च महिन्यात शिवाजी पार्कातील भर सभेत मांडला होता.

दरम्यान, राफेल घोटाळ्याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी संपूर्ण आकडेवारी आणि कोणताही पूर्व अनुभव नसलेल्या अनिल अंबानींच्या कंपनीचा सहभाग यावर बोट ठेवलं होत. इतकंच नाही तर नरेंद्र मोदी जेव्हा फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांच्या सोबत गेलेल्या उद्योगपतीच्या शिष्टमंडळात अनिल अंबानी सुद्धा होते, असा थेट आरोप केला होता. धक्कादायक म्हणजे हाच मुद्दा विरोधकांनी काही महिन्यांपूर्वी लोकसभेत अनेकवेळा उचलला होता. परंतु, त्यावर थातुरमातुर उत्तर देऊन भाजप ते पलटवून लावत होत. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तो भर सभेत उचलला आणि माध्यमांचे कॅमेरे तिकडे फिरले.

दुर्दैवाने त्यानंतर माध्यमांवर नेमका तोच खेळ झाला ज्याचा राज ठाकरे वारंवार उल्लेख करत होते. त्यांच्या भाषणातील राफेलचा मुद्दा माध्यमांवर न उचलता श्रीदेवी आणि अक्षय कुमारचा मुद्दा अधिक उचलण्यात आला आणि उलट त्यांनाच भावनिक कात्रीत पकडण्याचा प्रकार सुरु झाला, असं सभेनंतरच चित्र सर्व माध्यमांवर पाहायला मिळत होत. वास्तविक हा राफेल करार फ्रान्सच्या तत्कालीन अध्यक्ष होलँद यांच्या कार्यकाळात झाला आणि त्यांनीच त्यावर वक्तव्य केलं म्हणून आज भारतातील माध्यम थोडं तरी तोंड उघडत आहेत. परंतु देशातील विरोधक कितीही ओरडून आणि पुराव्यानिशी बोलले तरी प्रसार माध्यम त्यांच्याकडे कानाडोळा करणे हे सुद्धा सशक्त लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनी संरक्षण सारख्या संवेदनशील मुद्यावर रान उठवणं ही काळाची गरज आहे.

व्हिडिओ: काय म्हटलं होत राज ठाकरे यांनी त्या गुढीपाडव्याच्या सभेत राफेल घोटाळ्यावर?

वास्तविक भाजपने राफेल करारातील घोटाळ्यावर आयोजित पत्रकार परिषदेत सर्व आरोप फेटाळत उलट कॉग्रेसनेच अनिल अंबानींच्या कंपनीचं नाव सुचवलं होत, असं म्हटलं आहे. परंतु हे हास्यास्पद आहे, कारण भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स वरील नोंदणी असलेल्या कंपन्यांच्या यादी नुसार रिलायंस डिफेन्स लिमिटेडची स्थापना २८ मार्च २०१५ रोजी, रिलायंस डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची स्थापना २५ एप्रिल २०१५ आणि नागपूरच्या मिहान मध्ये जो एकत्रित प्रकल्प राबविला जाणार आहे, ज्याचा उल्लेख राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात केला होता त्या दसॉ रिलायंस एरोस्पेस लिमिटेडची स्थापना गेल्या वर्षी म्हणजे १० फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली आहे. मग ज्या कंपन्याच अस्तित्वात नव्हत्या त्यांचं नाव काँग्रेस कस काय सुचवेल असा प्रश्न उपस्थित होतो. पण दुसरा योगायोग म्हणजे मोदी नरेंद्र मोदी एप्रिल २०१५ मध्ये पहिल्यांदा फ्रान्सच्या दौऱ्यावर जातात काय आणि त्याच्या दहा बारा दिवस आधी म्हणजे २८ मार्च २०१५ रोजी रिलायंस डिफेन्स लिमिटेडची स्थापना होते काय आणि मोदी दौऱ्यावरून आल्यावर पुढील १०-१२ दिवसात रिलायंस डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची २५ एप्रिल २०१५ ला स्थापना होते काय? आणि हे म्हणजे दैवी योगायोग समजावे अशी भाजपची इच्छा असावी.

वास्तविक २०१२ मध्ये काँग्रेस हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडसाठी आग्रही होती, कारण त्यांचा ५० वर्षापेक्षा अधिक संरक्षण साहित्य निर्मितीचा अनुभव आहे आणि ती सरकारी कंपनी होती. वास्तविक मेक इन इंडिया अंतर्गत जर नियम दाखवायचा होता तर तो न्याय HAL सोबत होणे गरजेचे होते. संरक्षण क्षेत्रातील ४९ टक्के थेट परकीय गुंतवणूक ही HAL साठी सुद्धा करता आली असती. त्यामुळे ऑफसेट अट पुढे करून दाखविण्यात येत असलेली पळवाट हास्यास्पद आहे.

काय आहे तो भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स वरील कंपनी नोंदणी डेटा?

काय होत रवी शंकर प्रसाद म्हणजे भाजपचं ट्विट?

नागपूरमधील मिहान मध्ये जेव्हा “दसॉ रिलायंस एरोस्पेस लिमिटेड” च्या प्रकल्पाचा उदघाटन सोहळा झाला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनिल अंबानींवर इंग्लिशमध्ये खूप स्तुती सुमन उधळली होती. काय म्हटले होते मुख्यमंत्री या समारंभात?

अनिल अंबानी आणि नरेंद्र मोदी यांच्या या गोड नात्याची सुरुवात २०१३ मध्ये व्हायब्रण्ट गुजरातमध्ये झाली होती. त्यात अनिल अंबानींनी मोदींना थेट अर्जुनाची उपमा दिली होती. इतकंच नाही तर भाषणाच्या शेवटी अनिल अंबानी यांनी सर्व उपस्थित उद्योगपतींना उभं राहण्याची विनंती करत मोदींची टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करायला सांगितली होती.

व्हिडिओ: काय म्हटले होते अनिल अंबानी व्हायब्रण्ट गुजरात मधील भाषणात?

व्हिडिओ: मोदींच्या रशिया दौऱ्यात सुद्धा उद्योगपतींमध्ये अनिल अंबानी रशियन प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी कसे होते….तिथे सुद्धा संरक्षण खात्यासंबंधित करार होणार होते!

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1036)#Raj Thackeary(471)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या