16 April 2024 7:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
x

जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, ठाण्यात तणावाचं वातावरण, ईडी-सीबीआय नंतर विरोधकांविरोधात महिलास्त्र?

MLA Jitendra Awhad

MLA Jitendra Awhad | हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात मुक्काम कराव्या लागलेल्या आमदार जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत भर पडलीये. जितेंद्र आव्हाडांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणाचे पडसाद ठाण्यात उमटण्यास सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर टायर जाळण्यात आल्याच्या घटना समोर आल्यात. प्रकरणावर भाजपचे नेते किरीट सोमय्यांनीही ट्विट करत आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सवाल केलाय.

कळवा-खाडी पुलाच्या उद्धघाटन कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय. महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, की पोलिसांनी माझ्या विरुद्ध 72 तासात 2 खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे.. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. नंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र, यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला. 40 वर्षीय तक्रारदार महिलेने एका कार्यक्रमादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Molestation case registered against NCP MLA Jitendra Awhad in Mumbra check details on 14 November 2022.

हॅशटॅग्स

#MLA Jitendra Awhad(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x