19 October 2021 7:18 AM
अँप डाउनलोड

महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य: राम कदमांची उमेदवारी भाजपच्या मुंबईतील सर्व उमेदवारांना भोवणार?

मुंबई :  भाजपचे घाटकोपरचे वादग्रस्त आमदार राम कदम यांची विधानसभेची उमेदवारी भाजपच्या मुंबईतील सर्वच उमेदवारांना भोवण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. महिला मतदार हा मतदान प्रक्रियेत महत्वाचा घटक समजला जातो. अर्थकारणाच्या जोरावर त्यांनी मतदारसंघात निवडणूक प्रेरित रक्षाबंधांचे भावनिक कार्यक्रम जरी आयोजित केले असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वातील वास्तव वेगळं असल्याचं सिद्ध झालं आहे. मतदार संघातील ज्या मोफत आरोग्य आणि उपचाराच्या मदतीच ते मार्केटिंग करतात, त्या वास्तविक सरकारी योजनांतर्गत मिळणाऱ्या मोफत सेवा आहेत. परंतु, मतदारांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्या स्वतःच्या व्यक्तिगत नावावर खपवून मतपेटी मजबूत करण्याचे त्यांचे जुने प्रयत्न आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कठुआ आणि उन्नाव सारख्या बलात्काराच्या घटनांनी भाजपची प्रतिमा आधीच मालिन झाली आहे. त्या सर्व घटना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुन्हा डोकं वर काढू शकतात. त्यात मुंबईमध्ये सुद्धा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राम कदमांच्या व्हिडिओ क्लिप सर्व महिलांपर्यंत पोहोचवली जाईल आणि भाजप विरोध रान उठवलं जाईल, यात काडीमात्र शंका नाही. आगामी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार राम कदमांनी स्वतःचे कितीही वारकरी प्रवचनं व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला तरी, त्याला ड्रामेबाजी असच प्रतिउत्तर दिल जाईल असं जाहिरात तज्ज्ञांशी बोलल्यावर लक्षात आलं.

सर्वच विरोधी पक्षांच्या प्रचारात आणि विशेषकरून निवडणुकीदरम्यान महिलांच्या मेळाव्यात राम कदमांच्या वक्तव्याची आठवण प्रत्येक महिलेला करून दिली जाईल आणि भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असं राजकीय तज्ज्ञांना वाटत आहे. त्यामुळे भाजपच्या इतर उमेदवारांनी राम कदमांसोबत फोटो जरी काढला तरी त्यांच्या अडचणी वाढू शकतात. काही टेलिव्हिजन वृत्त वाहिन्यांनी तर राम कदमांवर प्रवक्ते म्हणून बंदी घातली आहे. सध्या त्यांनी मतदारसंघातील लोकांना देव दर्शनाच गाजर दाखवून स्वतः सोबत बांधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परंतु मतदार संघात नक्की काय विकास केला तो अजून अदृश्यच आहे.

परंतु अर्थकारणाच्या जोरावर मतदारसंघातील मतदाराला साड्या-छत्र्या-यात्रा अशा आमिषात बांधून स्वतःचा राजकीय सेतू कसा बांधायचा हे त्यांना चांगलं अवगत झालं आहे. परंतु, मतदार सुद्धा सर्वकाही घेऊन आयत्यावेळी कसा घात करतो हे त्यांना या निवडणुकीत समजू शकत. राम कदमांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे त्यांच्यावर भाजपचे जुने निष्ठावान नेते आणि पदाधिकारी नाराज असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे काही दिवसांपासून त्यांना पक्षाच्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे निमंत्रण दिल जात नसल्याचे भाजपच्या गोटातून समजले आहे.

हॅशटॅग्स

BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x