29 May 2022 3:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
x

नोटाबंदीला 15 महिने झाले, पण जुन्या नोटांची मोजणी अद्याप सुरूच.

नवी दिल्ली : मोदी सरकारने १५ महिन्यापूर्वी केलेल्या नोटबंदीला १५ महिने पूर्ण झाले असले तरी जुन्या नोटांची मोजणी अद्याप सुरूच असल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे. पीटीआय या वृत्त संस्थेने केलेल्या माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीत रिझर्व बँकेनेच ही माहिती दिली आहे.

१५ महिन्यानंतरही रिझर्व बँकेकडून अजूनही ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांची मोजणी सुरूच असल्याचे समोर आले आहे. रिझर्व बँकेने दिलेल्या माहितीनुसार ५०० – १००० रुपयांच्या नोटांची नेमकी आणि प्रमाणित माहिती तपासण्याची प्रक्रिया रिझर्व बँकेमध्ये सुरु असून, त्यानंतरच १५ महिन्यापूर्वी झालेल्या नोटबंदीत नक्की किती नोटा परत आल्या आणि त्यानंतरच विश्वसनीय माहित देणे शक्य होईल असे रिझर्व बँकेने माहितीच्या अधिकारात पीटीआय या वृत्त संस्थेला उत्तर दिले आहे. परंतु अंदाजित आकड्यात तफावत होऊ शकते असे ही बँकेने कळवले आहे.

भारतीय रिझर्व बँकेकडून जुन्या नोटांच्या मोजणीसाठी ५९ करन्सी व्हेरिफिकेशन अँड प्रोसेसिंग मशीनचा वापर करण्यात येत असल्याचे बँकेने कळवले असून ८ कमर्शिअल मशिन्स बँकेकडे असून एकूण ७ मशिन्स या नोटा मोजण्यासाठी भाडेतत्वावर घेतल्या आहेत. परंतु मोजणी चालू असलेल्या ठिकाणचे नाव सांगण्यास मात्र रिझर्व बँकेने नकार दिला आहे.

३० ऑगस्ट २०१७ रोजी रिझर्व बँकेने जो अहवाल सादर केला त्यात, नोटबंदीनंतर त्या तारखेपर्यंत १५.२८ लाख कोटी बँकेकडे परत आले. तसेच ती परत आलेली रक्कम ही एकूण रकमेच्या ९९ टक्के म्हणजे १६,००० कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत होते.

हॅशटॅग्स

#Demonetisation(2)RBI(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x