10 June 2023 6:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Video Viral | शिंदे पुत्र श्रीकांत शिंदेंचा राजकीय गेम भाजपकडून निश्चित, आधीच स्किप्टेड राजकीय रडगाण्याचे व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात? El-Nino Warning | अल निनो मुळे पॅसिफिक महासागर तापत आहे, जारी केला इशारा, भारतावर काय परिणाम होईल? Loksabha Election | भाजपमध्ये पडद्याआड हालचाली वाढल्या, लोकसभा निवडणूक 2023 मध्येच घेण्याची तयारी? मोदी-शहांची चिंता का वाढतेय? Numerology Horoscope | 10 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 10 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर्सची यादी सेव्ह करा! 2 महिन्यांत 173 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, जोरदार कमाई होईल Maan Aluminium Share Price | गुंतवणूकदार मालामाल! मान ॲल्युमिनियम शेअरने 1 लाखावर दिला 13 लाख परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स
x

Viral Video | धक्कादायक, फुटबॉल सामन्यात मोठा हिंसाचार उसळल्याने 127 लोकांचा मृत्यू

football match in Indonesia

Indonesia Football Match Video | इंडोनेशियामध्ये फुटबॉल मॅच सुरू असताना चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये 127 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पूर्व जावा मलंग रिजेंसी येथील कंजुरुहान स्टेडियममध्ये इंडोनेशियाई बीआरआई लीगा-1 च्या फुटबॉल सामना आयोजित करण्यात आला होता.

या हिंसाचारात 34 जणांचा मैदानात मृत्यू झाला तर उर्वरीत 93 जणांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. याशिवाय हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये 200 हुन अधिक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्टेडियममधील चेंगराचेंगरी रोखण्यासाठी पोलीस पुढे आले. मात्र, त्यांनाही ते थांबवता आले नाही. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केला. स्टेडियममधील गोंधळ काही वेळात थांबला, पण संतप्त लोक रस्त्यावर आले, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओंमध्ये लोकांनी सीमा ओलांडून पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Over 100 people were killed tonight in riots that broke out at a football match in Indonesia video trending 02 October 2022.

हॅशटॅग्स

#Football match in Indonesia(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x