22 October 2021 12:16 PM
अँप डाउनलोड

IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार

IPL 2021 DC Vs SRH Live

अबुधाबी, २२ सप्टेंबर | IPL 2021 स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद असा सामना रंगणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्लीच्या संघाने ८ सामन्यात १२ गुण मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर हैदराबादचा संघ ७ सामन्यात २ गुण मिळवत गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार – IPL 2021 DC Vs SRH Live Match on Hotstar :

दिल्ली संघाने हैदराबादल या सामन्यात पराभूत केल्यास गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थानी विराजमान होणार आहे. दिल्लीचं नेतृत्व ऋषभ पंतकडे आहे आहेत. तर हंगामाच्या मध्यातच सनरायझर्स हैदराबादने मोठा बदल करत डेव्हिड वॉर्नरला हटवून संघाने केन विलियमसनला कर्णधारपद दिले आहे. त्यामुळे आता केन विलियमसन संघाला तारणार का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

IPL-2021-DC-Vs-SRH-Live-Match-on-Hotstar

पहिल्या टप्प्यात श्रेयस अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर होता. आता त्याचं संघात पुनरागमन झालं आहे. श्रेयसमुळे दिल्लीची फलंदाजी आणखी मजबूत होणार आहे. दिल्लीला पृथ्वी शॉ आणि शिखर धवन चांगली सुरुवात करून देत आहेत. तर कर्णधार ऋषभ पंत, मार्कस स्टोइनिस आणि शिमॉन हेटमायर मधल्या फळीत आक्रमक खेळी करतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: IPL 2021 DC Vs SRH Live Match on Hotstar.

हॅशटॅग्स

#IPL2021(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x