19 July 2019 9:53 AM
अँप डाउनलोड

सेमीफायनलचा थरार! मँचेस्टरच्या मैदानात रंगणार टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड सामना

सेमीफायनलचा थरार! मँचेस्टरच्या मैदानात रंगणार टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड सामना

मँचेस्टर : मागील सलग ५ आठवडय़ांच्या साखळी फेरीच्या थरारानंतर आता विश्वचषक स्पर्धा महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन धडकली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या ४ संघांनी अनेक अडथळे मोडीत काढत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. त्यापैकी आज म्हणजे मंगळवारी मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर रंगणाऱ्या पहिल्या उपांत्य लढतीत भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच एकमेकांशी थेट भिडणार आहेत. भारताची आघाडीची फलंदाजीची फळी विरुद्ध न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाजीचा मारा असा हा रंगतदार सामना क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार आहे.

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दोन वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या भारताने साखळी फेरीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत ९ पैकी एकूण ७ सामने जिंकून गुणतालिकेत अव्वलस्थानी धडक मारली. दरम्यान यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. चौथ्या क्रमांकाचा अनुत्तरित तिढा आणि खेळाडूंच्या दुखापती यावर मात करत भारतीय संघाने मोठी मजल मारली आहे. परंतु आता भारतासमोर काहीशा अस्थिर असलेल्या न्यूझीलंडचे आव्हान असेल.

२०१५च्या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणाऱ्या न्यूझीलंडनेही धडाक्यात सुरुवात केली होती. मात्र अखेरच्या टप्प्यात निराशाजनक कामगिरी केल्यामुळे त्यांना जेमतेम उपांत्य फेरी गाठता आली. त्यामुळे दोन्ही संघादरम्यान तुंबळ युद्ध रंगण्याची शक्यता क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#ICC Cricket(7)#Indian Cricket Team(54)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या