देशात नेहरूंवर आगपाखड करणाऱ्या मोदींसमोर अमेरिकन नेत्याकडून नेहरूंचं कौतुक
टेक्सास: अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरातील एनआरजी स्टेडिअममध्ये हाऊडी मोदी कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. सोशल मिडीयावरही नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. कार्यक्रमस्थळी जवळपास ५० हजारांच्या आसपास नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरूवात करताना, अमेरिकेचे खासदार आणि काँग्रेस नेते स्टेनी हॉयर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वागत केले. यावेळी दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधावर भाष्य केले. तसेच, दोन्ही देशातील समानतेवरही चर्चा केली.हायर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मोदींसमोर महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरुंचे कौतुक केलं. या दोन दिग्गज नेत्यांच्या विचारांवरच दोन्ही देशांची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. हायर यांनी दोन्ही उभय देशांमधील मूल्यांची चर्चा केली, उत्तम भविष्याबद्दलही आशावाद व्यक्त केला. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये सुरक्षा, विज्ञान, परमाणू क्षेत्र, सॉफ्टवेअर व इतर क्षेत्रांमध्ये सौदार्हपूर्ण संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर, नेहरू आणि गांधी यांची शिकवण आजही महत्त्वपूर्ण असून दोन्ही देश त्यांच्याच विचारांवर चालतात, असेही हायर यांनी म्हटले.
त्यानंतर भारत देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य अतुलनीय आहे. भारताच्या नागरिकांनी मोदींना बहुमताने मोठा विजय मिळवून दिला आहे. आज मी आणि मोदी भविष्यातील स्वप्नांचा आनंद साजरा करण्यासाठी पोहोचलो आहोत, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. मला मोदींनी भारतात बोलावले तर मी नक्की येईल, असेही ट्रम्प म्हणाले. ह्युस्टनमध्ये ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, दोन्ही देशांमध्ये आर्थिक चमत्कार होत आहेत. अमेरिकेत भारतीय लोक क्रांतिकारी टेक्नॉलॉजी आणत आहेत. भारताकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत आहे. आम्ही याचे स्वागत करतो, असेही ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प पुढे म्हणाले की, भारत आणि अमेरिका सोबत मिळून चांगले काम करेल. अमेरिकेत भारतीय कंपन्या लाखो लोकांना रोजगार देत आहेत. भारतीय लोक अमेरिकेला मजबूत करत आहेत, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प पुढे म्हणाले की, भारत आणि अमेरिका सोबत मिळून चांगले काम करेल. अमेरिकेत भारतीय कंपन्या लाखो लोकांना रोजगार देत आहेत. भारतीय लोक अमेरिकेला मजबूत करत आहेत, असे ट्रम्प म्हणाले.
दरम्यान अमेरिकेत वर्षभरात राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहेत आणि त्यामुळे ट्रम्प ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्या रिपब्लिकन पक्षासाठी भारतीयांचे प्राबल्य असलेल्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन डल्लास या शहरातील भारतीय वंशाच्या लोकांचा पाठिंबा अत्यंत महत्वाचा आहे. कारण २०१६ मधील अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटिक पक्षातील उमेदवार हिलरी क्लिंटन यांना याच शहरातील ७५ टक्के भारतीय वंशाच्या मतदाराने भरभरून मतदान केलं होतं.
२०२०मधल्या अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकीची बीज ट्रम्प प्रशासनाने २०१९च्या मे महिन्यातच रोवली होती आणि त्यानंतर पुढील रणनीती आखली गेल्याचं तिथल्या राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. त्यानुसार अमेरिकेत मागील अनेक वर्ष तापवलेल्या स्थलांतरितांच्या मुद्याला तीरांजली देत विदेशी नागरिकांच्या अमेरिकेतील कायम वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड विषय पुढे केला. त्यानुसार जुनी पद्धत बंद करण्यात आणि त्याऐवजी ‘बिल्ड अमेरिका व्हिसा’ पद्धत लागू करण्याचे तेथील ट्रम्प प्रशासनाने निश्चित केले आणि इतर देशातील मतदारांना खुश केले.
त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, जगातील कोणत्याही माणसाला अमेरिकेत येण्यास बंदी नसेल. तुम्ही कोणत्याही देशात जन्मलेले असा तुमच्याशी कसलाही भेदभाव न करता तुम्हाला अमेरिकेत कायम स्वरूपी राहण्यासाठी ही नवीन व्हिसा पद्धत सुरू केली जाणार आहे. परंतु आता केवळ लॉटरी पद्धतीने नव्हे किंवा तुम्ही कोणाचे नातेवाईक आहात म्हणून नव्हे तर तुम्हाला अवगत असलेल्या उच्च दर्जाचे कौशल्य आणि तुमच्या गुणवत्तेच्या आधारावरच तुम्हाला अमेरिकेचा कायम वास्तव्याचा व्हिसा जारी केला जाईल असं निश्चित केलं आहे.
कारण २०१६ मधील निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध तिथले भारतीय एकवटले होते, कारण ट्रम्प यांनी इतर देशातील स्थलांतरित अमेरिकन लोकांच्या नोकऱ्या बळकावत हा मुद्दा २०१६ मधील निवडणुकीत प्रतिष्ठेचा केला होता. अमेरिकेत २००९ मध्ये स्थलांतरित मेक्सिकन लोकांची संख्या सर्वाधिक होती. मात्र २०१४ मध्ये अमेरिकेत स्थायिक होणाऱ्या भारतीय लोकांची संख्या सर्वाधिक वाढली आणि मेक्सिको देखील तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. त्यामुळे अमेरिकेत २०१६ साली झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीयांनी हिलरी क्लिंटन यांना भरभरून मतदान केलं होतं. त्यामुळे २०१६ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुका ट्रम्प यांच्या रिपब्लिक पक्षासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्यासाठीच ट्रम्प यांच्या पक्षातील याच भागातील सदस्य मोदींच्या आडून रणनीती आखात आहेत. भारताच्या राजकारणात जे महत्व उत्तर प्रदेशाला आहे, तेच महत्व अमेरिकेतील टेक्सास राज्याला असल्याने ट्रम्प आणि त्यांच्या टीमने येथे विशेष लक्ष दिलं आहे.
एकूण भाजप आणि ट्रम्प यांच्यामध्ये एक छुपा करार झाला असल्याची शक्यता तिथल्या राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. टेक्सास राज्यात गुजराती समाज मोठ्या प्रमाणावर स्थायिक असून इतर भाषिक देखील मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यामुळेच मोदींसोबत देशातील विविध राज्यातील तब्बल ३२० भाजप आमदारांची आणि काही खासदारांची फौज देखील तेथे हजर झाली होती आणि रिपब्लिकन’साठी आपापल्या समाजामध्ये वातावरण निर्मिती करणे हा त्यामागचा छुपा अजेंडा असल्याचं म्हटल्याचे जातं आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर इव्हेन्ट करून भारतात आणि अमेरिकेत वेगळी वातावरण निर्मिती केली जाते आहे. आधुनिक रशियन एस-४०० या क्षेपणास्त्र विरोधी युद्ध सामुग्रीवरून भारत सरकारवर आगपाखड करणारे ट्रम्प अचानक प्रेमळ झाले असून, २०१८ मध्ये भारताच्या स्वतंत्रता दिवसाच्या विशेष निमंत्रणाला भारतात येण्यास नकार देणारे ट्रम्प सध्या जाहीरपणे मोदींनी मला भारतात बोलाविल्यास नकीच येईन असं सांगत आहेत. भारतात महागाई, बेरोजगारी, नवे रोजगार, मानवी मूल्यांची पायमल्ली, महिला विषयक अत्याचार, अल्पसंख्यांकांवरील हल्ले आणि डॉलरच्या तुलनेत घटलेली रुपयाची किंमत भारतातील वास्तव सांगते. मात्र सध्या ट्रम्प यांना त्याचाशी काही देणं घेणं नसून ते देखील राजकीय फायद्यासाठी मोदींची स्तुती करतील अशीच शक्यता आहे.
तत्पूर्वी अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने भारतातील मोदी सरकारला चांगलाच दणका दिला होता. त्यात आधीच आर्थिक विषयांना अनुसरून चिंतेत असलेली भारतीय अर्थव्यवस्था अजून खाली जाऊ लागली आहे. कारण अमेरिकेने भारतातील व्यापाराला प्रोत्साहन म्हणून दिलेला जीएसपी (जनरलाईज सिस्टीम ऑफ प्रेफरन्स) दर्जा ५ जून पासून काढून घेण्याचा निर्णय घेतला होता.
यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होते की, भारताने अमेरिकी उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत सामान संधी देण्याचं कोणतंही ठोस आश्वासन दिलेलं नाही. त्यामुळे आम्हाला असा निर्णय घेणं भाग आहे. तत्पूर्वी मार्च महिन्यातच ट्रम्प यांनी टर्की आणि भारत या दोन्ही देशांचा जीएसपी दर्जा हटविण्याची शक्यता व्यक्त केली होते. कारण अमेरिकेच्या स्पष्टीकरणानुसार, भारतातील विविध प्रतिबंधांमुळे त्यांचे प्रचंड व्यावसायिक नुकसान होते आहे. त्यात भारताकडून अमेरिकी वस्तूंना समान दर्जा न दिल्याने आमच्या व्यापारावर अत्यंत गंभीर परिणाम होत आहेत असं व्हाईट हाऊसने म्हटले होते.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट