4 October 2023 8:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Vs Jupiter Wagons Share | बापरे! ज्युपिटर वॅगन्स शेअरने 3 वर्षात 4300 टक्के परतावा दिला, अक्षरशः पैशाचा पाऊस पडतोय हा शेअर Multibagger Stocks | सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स शेअरने अल्पावधीत 124% परतावा दिला, मजबूत कमाई करण्याची संधी Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अवघ्या एका महिन्यात 150 टक्के पर्यंत परतावा देत आहेत, फायदा घेणार? Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 04 ऑक्टोबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठे अपडेट, इंडेक्स नंबर घसरल्याने आता DA किती वाढणार? Stocks in Focus | एका आठवड्यात 53 टक्के पर्यंत परतावा देणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट पैसे गुणाकारात वाढवतील BOI Net Banking | सरकारी बँक ऑफ इंडियाच्या FD योजनेवरील व्याजदरात वाढ, गुंतवणूकदारांना मिळणार इतकं अधिक व्याज
x

Video Trending | ओरीजनल व्हिडिओ न दाखवता शीतल म्हात्रेंनी 'तो' व्हिडिओ माॅर्फ आहे हे कसं सिद्ध केलं? तेलंगणातही झाला व्हायरल

Video Trending

Video Trending | मुंबईतील एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रकाश सुर्वे आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या रॅलीतील एका आक्षेपार्ह व्हिडीओवरुन सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायेत. तो व्हिडीओ मॉर्फ केलेला असून माझ्या बदनामीच्या दृष्टीने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तो व्हिडीओ व्हायरल केला, असा थेट आरोप शीतल म्हात्रे यांनी केलाय.

या सगळ्या व्हिडीओच्या वादाचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. भाजप-शिवसेनेच्या महिला आमदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही याविषयावर रोखठोक भाष्य केलंय. एखाद्या महिलेची बदनामी नको. त्या व्हिडीओची स्पष्टपणे चौकशी करुन ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झालं पाहिजे. वस्तूस्थिती काय आहे हे लोकांना आणि सभागृहाला कळली पाहिजे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलीये.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागाठणे येथे प्रकाश सुर्वे यांच्या कार्यक्रमास आले होते. तिथे एक व्हिडीओ काढून त्यावर चुकीच्या पद्धतीने गाणे टाकून आणि चुकीचा संदेश लिहून मातोश्री या फेसबुक पेजवर व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. ठाकरे गटाच्या आयटी सेलकडून तो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला, असा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला होता. मात्र, “शितल म्हात्रे च्या मते “तो” व्हिडिओ माॅर्फ केलेला आहे तर मग त्या ओरीजनल व्हिडिओ पोस्ट का करत नाहीत?” असा थेट प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला पदाधिकारी अयोध्या पोळ पाटील यांनी व्हिडिओ ट्विट करत केला आहे.

काही व्हर्चुअल टूल नुसार त्यात कोणतीही छेडछाड झाली नसल्याचं प्राथमिक व्हेरिफिकेशनमध्ये समोर येतंय. वास्तविक रॅलीत चालता-चालता कोणीतरी तो रेकॉड केला होता, पण त्यात असा क्षण टिपला जाईल याची मोबाईल रेकॉर्ड करणाऱ्यालाही कल्पना नसावी असं म्हटलं जातंय. विशेष म्हणजे गाडीच्या जवळून रेकॉर्ड करणारी व्यक्ती ही शिंदेंच्या गटातीलच असावी असं प्राथमिक आकलनातून समोर येतंय. ठाकरेंचे कार्यकर्ते कशाला तिथे जवळ रेकॉर्ड करायला जातील? कारण सध्या युट्युब शॉर्ट चॅनेल बनवणाऱ्या लाखो तरुणांनाचे युट्युबवर अकाउंट्स आहेत. त्यामुळे अनेक तरुण मोबाईल घेऊन असे कोणतेही क्षण टिपून त्यावर गाण्याचा व्हॉइस ओव्हर देऊन अपलोड करतात आणि त्यावर व्हिव्ज प्रमाणे पैसे देखील कमावले जातात. त्याच हेतूने हा व्हिडिओ प्रथम युट्युब शॉर्ट चॅनेलवर आणि नंतर तिकडून ट्विटरवर आल्याचं म्हटलं जातंय.

युट्युब शॉर्टसाठी गाणं ऍड केलं आणि मॉर्फ आहे बोलण्याची संधी मिळाली?
हा विडिओ आता महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातही व्हायरल होतोय आणि त्याला कारण आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्या वाहनात असलेली उपस्थिती. तेलंगणातील सत्ताधारी पक्षाच्या सोशल मीडिया प्रमुखांनी हा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Video Trending of Sheetal Mhatre in Telangana check details on 13 March 2023.

हॅशटॅग्स

#Video Trending(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x