20 April 2024 9:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

VIDEO | भाजपच्या योगी सरकारचा कळस | गंगेत वाहणारे मृतदेह पोलिसांनी पेट्रोल-टायर टाकून जाळले

Uttar Pradesh Corona pandemic

लखनऊ, १८ मे | उत्तर प्रदेशातील कोरोना बळींची संख्या काही थांबताना दिसत नाही. कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याने मृतदेह जाळायला स्मशानभूमीही कमी पडू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी गंगेच्या काठावरच मृतदेह दफन करायला सुरुवात केली आहे. सरकारने मनाई केल्यानंतरही लोक गंगेच्या काठावर मृतदेह पुरत आहेत. त्यामुळे पाहावं तिकडे मृतदेहच मृतदेह दिसत असून त्यांची मोजदाद करणंही कठीण झालं आहे

गंगेच्या काठावर मृतदेह दफन केले जात असल्याचे आणि गंगेत मृतदेह सोडल्या जात असल्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची भावना निर्माण झाली होती. देशात गेल्या काही दिवसांपासून गंगा नदीत मृतदेह वाहून येण्याचे प्रमाण वाढतच आहे. उत्तर प्रदेश सरकारने नदीमध्ये मृतदेह दफन करण्यावर बंदी घातली होती. त्यासोबतच संबंधित भागात पोलिसांचा बंदोबस्तदेखील वाढवण्यात आला होता. सरकारने कडक निर्देश जारी केल्यावरही मृतदेह वाहून येण्याचे प्रमाण कमी होत नाहीये. शासन प्रशासन या मृतदेहांची योग्य विल्हेवाट लावण्यावरुन काळजीत पडले आहे.

अशातच उत्तर प्रदेशातील बलियामधून एक असंवेदनशील आणि लाजीरवाणा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही पोलिस अधिकारी गंगा नदीतील वाहत येणार मृतदेह बाहेर काढत आहे. त्यानंतर मृतदेहांवर पेट्रोल आणि टायर टाकत जाळत आहे. दरम्यान, यामध्ये काही लोकांसोबत पोलिस अधिकारीही दिसतात.

माहितीनुसार, हा व्हिडिओ बलियातील माल्देपूरचा आहे. ज्यामध्ये काही पोलिस कर्मचारी मृतदेह हे लाकडासह पेट्रोल आणि टायर टाकून जाळत आहे. काही वेळातच या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. त्यानंतर संबंधित प्रकरणात 5 पोलिस अधिकार्‍यांना असंवेदनशीलतेच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षक विपिन टाडा यानी दिली.

 

News English Summary: An insensitive and embarrassing video has surfaced from Balia in Uttar Pradesh. This video is currently going viral on social media. In this video, some police officers are removing bodies from the river Ganga. The bodies are then cremated with petrol and tires. Meanwhile, police officers are also seen in it along with some people.

News English Title: Uttar Pradesh Ganga river Balliya corona dead bodies cremated using tires and petrol news updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x