20 June 2021 3:36 PM
अँप डाउनलोड

लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त

Loksabha Election 2024

मुंबई, १८ मे |  सध्या देशात कोरोनाने वातावरण इतकं बिघडलं आहे की नरकयातना भोगणाऱ्या सामान्य नागरिकांच्या मनात मोदी नावाच्या प्रति प्रचंड चीड निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजपाला देखील ते जाणवत असल्याने त्यांच्या पक्षात देखील वरिष्ठ पातळीवर चिंता वाढली आहे. मोदी हेच भाजपच्या सत्तेत येण्याचं कारण आहे आणि त्यांच्याप्रती लोकांमध्ये चीड निर्माण झाल्याने भाजपमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण आसल्याच वृत्त आहे. आरएसएसच्या धुरंदरांना देखील ते समजल्याने कोरोना आपत्तीत ‘पॉझिटिव्हिटी’चे हास्यास्पद प्रकार सुरु झाले आहेत. त्यामुळे मोदी नामाला उतरती कळा लागल्याने भविष्यात काय आखणी करावी या चिंतेत भाजप असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

परिणामी आतापासून २०२४ मधील लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. विषयही तसाच आहे, कारण अनेक राजकीय विश्लेषकांशी यासंदर्भात बोलल्यावर २०२४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पायउतार होणार असे संकेत मिळत आहेत. मात्र त्याला एक-दोन नव्हे तर अनेक कारणं तज्ज्ञांनी सविस्तर मांडली आहेत. ती सविस्तर कारणं अशा प्रकारे आहेत…

उत्तरेकडील राज्यात मोठा ‘कोरोना फटका’ बसणार:
भाजपाची दिल्लीतील सत्तेचं मुख्य कारण म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातून सलग दोन टर्म मोदी लाटेत निवडून आलेले खासदार असच म्हणावं लागेल. मात्र याच पट्यातील इतर राज्यात रोजगारासाठी गेलेल्या मजुरांना पाहल्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊनचा मोठा फटका बसला होता. विशेष म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत युपी, बिहार आणि मध्य प्रदेशात हाहाकार माजवला आहे. अगदी मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत म्हणजे गंगेत आणि गंगेच्या घाटावर मृत्यूचं तांडव पाहायला मिळतंय. उत्तरेकडील या राज्यांमध्ये थेट मोदींविरोधातच प्रचंड रोष दिसू लागल्याने याचा मोठा फटका भाजपाला २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत बसण्याची दाट शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणूक आणि भविष्यात भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा निष्फळ ठरण्याचे संकेत:

  1. प्रभू रामाच्या भूमीत भाजपचा पराभव:
    केंद्रात, राज्यात सत्तेत आणि हिंदुत्वाचा मुद्दा ज्यामध्ये प्रभू राम यांच्या नावाने राजकारण खेळणाऱ्या भाजपाला पंचायत निवडणुकीत थेट अयोध्येत फटका बसला आहे. विशेष म्हणजे समाजवादी पक्ष ज्यांची प्रतिमा मुस्लिम धार्जिणा पक्ष अशी मांडणी भाजप नेते करतात त्याच समाजवादी पक्षाला अयोध्येत एकूण ४० जागांपैकी सर्वाधिक 24 जागां मिळाल्या असून भाजपाला अवघ्या ८ जागा मिळाल्या आहेत.
  2. मोदींच्या वाराणासीतही सपाचा विजय:
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणासीतही भारतीय जनता पक्षाला पराभवाचा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला आहे. काशीत जिल्हा पंचायत समितीच्या एकूण 40 जागा आहे. त्यापैकी केवळ आठ जागांवरच भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला आहे. तर समाजवादी पार्टीला 14 आणि बसपाला पाच जागांवर विजय मिळाला आहे.
  3. श्रीकृष्णांच्या मथुरेतही पदरी निराशा:
    भगवान श्रीकृष्णांची नगरी समजल्या जाणाऱ्या मथुरेतही भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. मथुरेमध्ये बसपाने बाजी मारली आहे. बसपाने 12, आरएलडीने 9 जागंवर विजय मिळविला आहे. तर भाजपाला 8 जागा मिळाल्या आहेत. सपाला 1च जागा जिंकता आली आहे. 3 अपक्ष जिंकले आहेत.

लोकसभेसाठी महत्त्वाच्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कोरोनाने हाहाकार:
देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजला आहे. मात्र लोकसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कोरोनाने मोठा हाहाकार माजला आहे. दोन्ही राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून गंगा नदीत अथवा गंगा घाटात हिंदू रुग्णांची प्रेतं गाडण्याची वेळ सामान्य लोकांवर आली आहे. गंगेतील भीषण प्रकारामुळे हिंदूंच्या मनावर आघात झाल्याचं समाज माध्यमांवर पाहायला मिळतंय. तसेच दोन्ही राज्यांमध्ये आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने भाजपाला भविष्यात सर्व अवघड जाणार असल्याचं म्हटलं जातंय.

देशातील १८ राज्यांमध्ये आणि केंद्रातही भाजपचं सरकार, त्यामुळे कोरोना आणि इतर मुद्यांवरून फटका निश्चित:
देशात सध्या कोरोनाच्या आपत्तीने देशवासीय हैराण झाले आहेत. देशात सध्या मृत्यूचं तांडव पाहायला मिळतंय. एका बाजूला अनेक राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले असताना दुसरी एक बाजू भाजपाला भोवण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहेत. कारण देशातील एकूण १८ राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे आणि त्यात केंद्रातही भाजपाची सत्ता असल्याने त्यांना जवाबदारी झटकायला देखील पर्याय नाही. कोरोनाकाळातील सर्व रोष आणि इतर मुद्यांवरून या १८ राज्यांमध्ये भाजपाला २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येतं आहे.

मोदी वाराणसीतच धोक्यात, परिणामी दुसरा मतदारसंघ किंवा दोन मतदारसंघातून उमेदवारी:
मोदी वाराणसीत १-२ वेळा दिसले ते केवळ धार्मिक इव्हेन्ट साठीच आणि त्यानंतर ते वाराणसीत फिरकले देखील नाही किंवा तिथला कधीही आढावा घेतला नाही. मोदींनी या मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न केलेले नाहीत. त्याचा प्रत्यय कोरोना आपत्तीत आला आणि या मतदारसंघातील मोदींच्या कर्तृत्वाची पोलखोल झाली आहे. आरोग्य व्यवस्थेचे येथे तीनतेरा वाजल्याने लोकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्व उमेदवार मिळून एक उमेदवार देऊन मोदींना पडतील अशी शक्यता आहे. परिणामी मोदींना दोन मतदारसंघातून उमेदवारी देण्याची वेळ येऊ शकते. मात्र त्यामुळे मोदी आणि भाजपबद्दल नकारात्मक संदेश जाऊन त्याचे देशात पडसाद उमटतील अशी शक्यता आहे.

५ राज्यातील निवडणुका पुढे ढकलणं शक्य असताना मोदींनी ते केलं नाही आणि कोरोनाच्या फैलावाला कारणीभूत ठरले:
देशात कोरोनाची दुसरी लाट असताना देखील मोदींनी देशातील निवडणूका पुढे ढकलण्याची जवाबदारी घेतली नाही. उलट निवडणूक पूर्व आणि निवडणुकीदरम्यान मोठं मोठ्या प्रचार सभा भरविण्यासाठी त्यांनी पिढाकार घेतला जे कोरोना स्प्रेडर ठरलं आहे हे आकडेवारीतून समोर आलं आहे. विशेष म्हणजे माध्यमातून देखील निवडणूक प्रचार आणि कुंभ मेळ्याच्या आयोजनावरून दाखवलेला बेजवाबदारपणा अधोरेखित झाला. परिणामी लोकांचा देखील मोदींवर रोष वाढला आहे.

जगभरातून मोदींवर थेट टीका:
देशात कोरोनाची दुसरी लाट असताना देखील मोदींनी देशाचे पंतप्रधान म्हणून दाखवलेला बेजवाबदारपणा जगातील माध्यमांनी अधोरेखित केला. विशेष म्हणजे त्यात थेट मोदींना दोषी ठरवत ते कोरोनाचे सुपर स्प्रेडर असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे देशात होणारी टीका जगातील माध्यमांनी देखील अधोरेखित केल्याने मोदींबद्दल सर्वत्र आजही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात तब्बल ६ कोटीहून अधिक लस प्रथम परदेशात पाठवल्याने मोदींनी देशवासीयांचा जीव धोक्यात घातल्याचं लोकांना देखील पटल्याने भाजप विरोधात तीव्रता वाढली आहे. देशात रोज ४ हजारहून लोकं मरत आहेत आणि देशात लसींचा तुटवडा जाणवतोय त्याला कारणीभूत मोदीच आहेत हे सत्य लोकांना माहित झालं आहे.

ऑक्सिजन, लस, वेंटीलेटर्स ते रेमडीसीवीर सर्वच मोदी नियंत्रीत असल्याचं लोकांना कळून चुकलंय:
कोरोना आपत्तीत मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या मृत्यूला एकतर ऑक्सिजन, रेमडीसीवीर, व्हेंटीलेटर्स किंवा लोकसंख्येच्या तुलनेतील अल्प लसीकरण आहे. मात्र दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टी मोदी सरकारच्या नियंत्रणात आहेत. अगदी पीएम केअर’मधून अनेक राज्यांमध्ये पाठविण्यात आलेले वेंटीलेटर्स सदोष असल्याचं समोर आल्याने लोकांनी दान केलेला पैसा देखील सत्कारणी लागले नसल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे या मृत्यूंना देखील जवाबदार असल्याचं अनेकदा माध्यमांमधून अधोरेखित झालं आहे. आज प्रत्येकाच्या घरातील किंवा नात्यातील किंवा शेजारील व्यक्ती कोरोनाची बळी ठरली आहे. त्यामुळे रोष मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

सलग दोन टर्म म्हणजे १० वर्ष केंद्रात सत्तेत असल्याने अँटिइन्कबंसी भोवणार:
मागील दोन टर्म म्हणजे १० वर्ष सत्तेत असूनही मोदी सरकारने लोकांना स्वप्नं दाखविण्यापेक्षा कोणतीही विशेष कामगिरी केलेली नाही. पहिल्या टर्ममध्ये म्हणजे ५ वर्षातच भाजपने विकास हरवल्याचे सिद्ध केल्याने त्यांना भारतीय लष्कर आणि शहीद सीआरपीएफ जवानांच्या नावावर मतं मागण्याची वेळ आली होती आणि भावनिक होऊन मतदार भाजपच्या राजकारणाला बळी देखील पडला. मात्र आता पुढची टर्म देखील राम मंदिर, पुतळे आणि सेंट्रल विस्टा असे मुद्दे करणार हे निश्चित झालं आहे आणि त्याला कारण विकास आजही हरवलेला आहे. त्यामुळे भाजपाला २०२४ मध्ये अँटिइन्कबंसी भोवणार असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय.

महागाई, पेट्रोल-डिझेलच्या विषयावर मोदींना बोलण्याचा अधिकारच उरला नाही:
२०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत येण्याचं मुख्य कारण होतं महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर असंच म्हणावं लागेल. मात्र तत्कालीन युपीए सरकारवर पेट्रोल-डिझेलच्या दरांवरून टीका करणाऱ्या मोदी सरकारने आता स्वतःच सर्व विक्रम मोडले आहेत. थोडक्यात बोलायचे झाल्यास २०२४ मध्ये प्रचाराच्या मंचावरून पेट्रोल-डिझेल आणि महागाईवरून बोलण्याचा अधिकारच गमावला आहे. किंबहुना या विषयांना मोदी सरकार हात देखील घालणार नाही हे देखील सत्य आहे आणि परिणामी हा मुद्दा विरोधकांच्या बाजूने मोठी कामगिरी करून जाणार.

पोकळ आश्वासनांमुळे बेरोजगारीमुळे वाढली आणि तरुणांमध्ये रोष देखील:
प्रतिवर्षी दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या मोदी सरकारने खाजगी क्षेत्रात रोजगार वाढेल असं काही केलंच नाही. उलट नोटबंदी सारखे चुकीचे निर्णय घेऊन अनेक लघु उद्योगांना बंद करण्यास कारणीभूत ठरले आहेत. दुसऱ्या बाजूला सरकारी क्षेत्रातील कंपन्या विक्रीस काढून तेथे देखील बेरोजगार निर्मितीचे कारखाने उभे केले आहेत. त्यात नोटबंदीनंतर आता लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था बिकट झाल्याने भविष्यात परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि परिणामी बेरोजगारीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

अर्थव्यवस्थेला ऐतिहासिक उतरण:
देशाला विकासाची स्वप्न दाखवत मोदींच्या सत्ताकाळात अर्थव्यस्वस्थेचा उलटा प्रवास सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन करण्याची घोषणा आणि प्रत्यक्ष राबवली जाणारी आर्थिक धोरणं यांचा कोणताही ताळमेळ नसल्याचं दिसतंय. देशाला शब्दखेळांत अडकवून ठराविक उद्योग समूहांसाठी मोदी सरकार काम करत असल्याचं वेळोवेळो सिद्ध झालंय. GDP ने तर निच्चांकाची तर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यामुळे अर्थव्यस्वस्थेचा बट्याबोळ झाला आहे मोदींच्या कारकिर्दीत हे अधोरेखित झालं आहे. परिणामी याचा फटका २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत बसणार असं राजकीय तज्ज्ञांना वाटतंय.

निवडणुकीत लष्कराच्या कर्तृत्वावर लोकं पुन्हा मोदींना मतं देणार नाहीत:
मोदी सरकारने स्वतःच्या पब्लिसिटीसाठी भारतीय लष्कराच्या कर्तृत्वाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केल्याचं पाहायला मिळालं आहे. मोदी संकटात आले की ते पाकिस्तानच्या नावाने ओरडा करत भारतीय लष्करासारखा भावनिक मुद्दा पुढे करतात हे आता सर्वश्रुत झालं आहे आणि अगदी २०१९ मधील लोकसभा निवडणूक मोदींनी भारतीय लष्कर आणि शहीद सीआरपीएफ जवानांच्या नावावर जिंकल्याचं देखील देशाने पाहिलं आहे. मात्र आता पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे आणि लोकांना देखील या गोष्टी समजू लागल्या आहेत. त्यामुळे असे भावनिक मुद्दे आता भाजपच्या अंगलट येतील अशी वातावरण निर्मिती झाली आहे.

दक्षिणेत कर्नाटक वगळता भाजपाची स्थिती गंभीर होण्याची शक्यता:
२०२४ लोकसभा निवडणुकीत देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपाची स्थिती कठीण असेल. दक्षिणेतील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळातील स्थितीचा आढावा घेतल्यास भाजप कर्नाटकात वगळून इतर ४ राज्यांमध्ये नगण्य असेल असा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळातील स्थानिक पक्ष भाजपाला डोकादेखील वर काढू देणार नाहीत. त्यात कर्नाटकात देखील आता पक्षाची प्रतिमा डागाळल्याने त्याचे देखील चटके बसणार आणि काँग्रेस उजवी कामगिरी करून जाईल असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

महाराष्ट्रात शिवसेना सोबत नसल्याने फटका बसणार तर गुजरात-गोव्यात कोरोनामुळे स्थिती विरोधात:
महाराष्ट्रात शिवसेना भाजपसोबत नसल्याने त्यांचा मार्ग कठीण झाला आहे यात वाद नाही. त्यात राज्यातील फडणवीसांपासून सर्वच भाजप नेते केवळ सत्तेसाठी झुंजताना राज्याने पाहिलंय. त्यात कोरोना आपत्तीत केंद्रातून मदत अधिकची मदत आणण्याऐवजी भाजपचे राज्यातील नेते केवळ राजकारण आणि मोदी सरकारची कातडी वाचविण्यात व्यस्त असल्याचं महाराष्ट्राने पाहिलं आहे. फडणवीस पुन्हा येण्याच्या भुकेने किती कासावीस झाले आहेत ते पुन्हा पुन्हा त्यांच्या कृतीतून सिद्ध झालंय. भाजपाची सत्ता असणाऱ्या महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या ढिसाळ कामगिरीकडे कानाडोळा करून भाजप नेते राज्य सरकारला कोरोना आपत्तीत वारंवार व्यत्यय आणत होते हे राज्याने पाहिलं आहे. त्यात चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि अतुल भातखळकर हे राज्यात लोकांचा पाठिंबा असणारे नेते नसून ती नैतृत्व ट्विटरपुरता मर्यादित आहेत. त्यात कोरोना आपत्तीमुळे गुजरात मॉडेलची देशात पोलखोल झाली आहे. तर कोरोनामुळे गोव्यातील सरकारला फुटलेला घाम देश पाहतो आहे. या तीनही राज्यांमध्ये भाजपला उतरणी लागण्याची दाट शक्यता आहे.

मोदींच्या नावावर किंवा मोदींच्या चेहऱ्यावर मतं मागण्याची संधी कोरोना आपत्तीने संपुष्टात आणली आहे:
कोरोना आपत्तीमुळे सामान्य लोकांना आज सर्वाधिक चीड येतेय ती मोदींची असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोरोना आपत्तीने भारतीयांच्या मनावर कोरलेली जखम आणि त्यांच्या मनावर झालेले आघात मोदींप्रती प्रचंड रोष निर्माण करत असल्याचं आज सार्वजनिकरित्या अनुभवायला मिळतंय. दुसऱ्या लाटेत देशाला वाऱ्यावर सोडून मोदी निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त असल्याचं देशाने पाहिलं आहे. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोना नियमांचे डोस पाजून मोदी स्वतः भव्य रॅली करण्यात व्यस्त होते आणि त्यातून कोरोनाचा अजून प्रसार झाल्याचं आकडेवारीतून सिद्ध झालंय. ऑक्सिजन, रेमडीसीवीर, व्हेंटीलेटर्स आणि लस अशा सर्वच गोष्टींचं नियंत्रण मोदी सरकारकडे आहे आणि तेच चुकीच्या व्यवस्थापनाने लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं आहे. त्यामुळे मोदींच्या नावाने लोकं आता तिसरी टर्म भाजपाला मतं देणार नाहीत.

राम मंदिर आणि सेंट्रल विस्टाचे भव्य इव्हेन्ट केल्याने लोकं भाजपाला मतदान करणार नाहीत:
कोरोना आपत्तीमुळे लोकांना आरोग्य व्यवस्था आणि त्यासंबंधित पायाभूत सुविधांचे महत्व पटले आहे. मार्केटिंगच्या आहारी गेलेला मतदार मागील ६-७ वर्ष असाच पेड मार्केटींगचा बळी ठरतोय आणि आज त्याचच बळी जाण्यास सुरुवात झाली आहे. जनतेचा बळी जात असताना मोदी मात्र निवडणुकांना बळ देताना पाहिलं आणि देशाचा पैसा लसीकरणाऐवजी सेंट्रल विस्टासारख्या गरजेच्या नसलेल्या विषयांवर विरोध असताना देखील व्यर्थ घालवताना देशाने उघड्या डोळ्याने पाहिलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी जरी राम मंदिर उदघाटनाचा घाट मोदी सरकारने घातला तरी लोकांना तो निवडणुकीचा मुद्दा नसेल हे निश्चित आहे.

‘मोदी नाही तर कोण’ यापेक्षा ‘कोणीही चालेल पण मोदी नको’ असाच विचार लोकांमध्ये धृढ होतोय:
कोरोना आपत्ती, बेरोजगारी, महागाई, हरवलेला विकास अशा सर्व विषयावरून मोदींबद्दल लोकांच्या मनात रोष निर्माण झालेला पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे कोरोना आपत्तीत सामान्य लोकं नरकयातना भोगत असल्याने मोदींच्या प्रति देशात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. मागील काही काळ भाजपने ‘मोदी नाही तर कोण’ असं प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र मोदींप्रती आता एवढा रोष पाहायला मिळतोय की ‘कोणीही चालेल पण मोदी नको’ असाच विचार लोकांमध्ये धृढ होतोय.

काँग्रेस नव्हे तर प्रादेशिक पक्षच मोदींच्या सत्तेतून पायउतार होण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता?
देशातील उत्तरेकडील राज्यांपासून ते दक्षिणेकडील राज्यांपर्यंत प्रमुख प्रादेशिक पक्षच मोदींच्या सत्तेतून पायउतार होण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काँग्रेस २०२४ मध्ये देखील विशेष कामगिरी करणार नाही. त्याला प्रमुख कारण असेल काँग्रेसचं नैतृत्व आळशी आणि निराशावादी विचारांचं झालं आहे. त्यात जमिनीवरील पक्ष बांधणीपेक्षा काँग्रेस समाज माध्यमांवर भरकटल्याचं पाहायला मिळतंय. आळशी यासाठी म्हटलं कारण २०१९ मधील महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी केवळ एक सभा मुंबईत घेतली होती. त्यात सोनियांचं आजारपण आणि प्रियांका गांधी देखील प्रचारासाठी मेहनत घेणाऱ्या दिसत नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्यांमधील निवडणुकीत देखील तेच घडलं. एकट्या ममतांनी महिला असूनही १०० हुन अधिक सभा घेतल्या होत्या आणि रोड शो वेगळे घेतले आणि तेच त्यांच्या बहुमताचं कारण ठरलं. तर काँग्रेसच्या अपयशाचं कारण त्यांचा आळस आणि नकारात्मक दृष्टिकोन ठरला आहे. काँग्रेस नैतृत्व निवडणुकीत कोणतही ध्येय समोर ठेवून त्यादिशेने मेहनत घेत नाही. त्यामुळे कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश अशा मोजक्या राज्यात काँग्रेस दिसेल आणि काँग्रेसही प्रादेशिक पक्षांच्या लाईनमध्ये दिसेल. त्यानंतरही त्यांनी हट्ट केल्यास उरले सुरले खासदार देखील एक गट बनवून बाहेर पडतील. त्यामुळे २०२४ मधील वास्तव स्वीकारून प्रादेशिक पक्षासोबत जाण्याची वेळ येईल आणि त्यानंतर पक्षविस्तारावर काम करावं लागेल.

तर ममता बॅनर्जी विरोधकांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवार बनण्याची शक्यता:
मोदी-शहा आणि भाजपाला त्यांच्याच शैलीत आक्रमकपणे सामना करण्याची कुवत ममतांमध्ये आहे हे सिद्ध झालं आहे. पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडणाऱ्या संपूर्ण देशातील भाजपाला आणि स्वकीयांना आडवं करून त्यांनी बहुमताने सत्ता राखली आहे. मोदी-शहांना सुद्धा याची चुणूक लागली असल्याने ते प. बंगालमध्ये लगेच केंद्रित झाल्याचं सीबीआय’च्या धावपळीवरून सिद्ध झालं आहे. ममतांचे काँग्रेस वगळता देशातील सर्वच पक्षांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. एक महिला आणि सुशिक्षित चेहरा असल्याने त्यांना मोदी विरोधकांचे नेते देखील भविष्यातील गरज ओळखून मान्यता देतील अशी शक्यता आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे त्यात महत्वाची भूमिका बजावतील अशी शक्यता वर्तविण्यात येतं आहे. महिला असल्याने भाजपाला विखारी प्रचार देखील अंगलट येईल आणि मतदानात महिला वर्गाचा मोठा फटका बसून ऐतिहासिक पराभवाचा सामना करावा लागू शकतो. इतर राज्यांच्या द्वेषी म्हणून ममतांची अजिबात प्रतिमा नाही आणि उत्तम हिंदी बोलू शकत असल्याने देशभर प्रचारात त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. कोरोना देशभर कमी झाल्यानंतर विरोधकांच्या बैठका सुरु होण्याची शक्यता आहे.

२०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी शेतकरी आंदोलक भाजप विरोधात प्रचार करण्याची शक्यता:
नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्यांच्या निवडणुकीत शेतकरी संघटनांनी पश्चिम बंगाल, तामिळनाडूत सभा घेऊन गावखेड्यात भाजपाला मतदान न करण्याचं आवाहन केलं होतं आणि त्याचे सकारात्मक संदेश निवणुकीच्या निकालात पाहायला मिळाले आहेत. कारण तीन प्रमुख राज्यांपैकी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा टीएमसी बहुमताने पुन्हा सत्तेत आला आहे. तामिळनाडूत जयललितांचा अण्णा द्रमुक भाजपसोबत गेला आणि स्वतःची सत्ता गमावून बसला आहे, तर केरळमध्ये डाव्यांनी भाजपाला नावालाही शिल्लक ठेवलं नाही. त्यामुळे इथे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काय होणार त्याचे संकेत मिळाले आहेत.

हरियाणा आणि पंजाब पट्ट्यात शेतकरी रोष उमटणार:
देशातील शेतकरी आंदोलन मोठ्या प्रमाणावर देशभरच नव्हे तर जगभर गाजल्याचं पाहायला मिळालं आहे. कोरोना आपत्तीमुळे ते तूर्त स्थगित करण्यात आलं असलं तरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा पेट घेण्याची शक्यता आहे. सध्या हरियाणामध्ये भाजपही सत्ता आहे तर पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. शेतकऱ्यांचं वर्चस्व असलेल्या या पट्ट्यात हरियाणामध्ये भाजपला मोठा फटका बसणार हे निश्चित आहे तर पंजाबमध्ये भाजपचं काहीच चालणार हे देखील जवळपास निश्चित आहे. कारण शेतकऱ्यांच्या होमलँडमध्ये भाजप उमेदवारांविरोधात मतदारांना मोठी आवाहनं देऊन भाजप उमेदवारांना पाडण्याची विनंती केली जाऊ शकते असं राजकीय तज्ज्ञांना वाटतंय.

‘ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंग’ची ताजी आकडेवारी:
देशातील प्रमुख नेत्यांना मान्यता देण्यासंदर्भात सर्वसामान्याचे मत जाणून घेणाऱ्या मार्निंग कन्सल्टच्या ‘ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंग’ची ताजी आकडेवारी समोर आली होती. त्यानुसार १ मे ते ११ मे दरम्यान मोदींचे अ‍ॅप्रूवल रेटींग १० टक्क्यांनी कमी झालं. मोदींच्या डिसअ‍ॅप्रूवल रेटिंगमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एक मे आधी २१ टक्क्यांवर असणारी हे रेटींग ११ मे नंतर तब्बल ३१ टक्क्यांवर पोहचलीय.

सरकारी कंपन्यांमधील कर्मचारी आणि कुटूंबियांमध्ये प्रचंड रोष:
देशात जवळपास ५० लाख केंद्रीय कर्मचारी आहे आणि या कर्मचाऱ्यांमध्ये मोदी सरकारच्या धोरणांमुळे आणि सरकारी कंपन्या विकण्याच्या तसेच खाजगीकरणाच्या सपाट्यामुळे प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचा रोष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदानातून व्यक्त होण्याची अधिक शक्यता आहे असं तज्ज्ञांनी वाटतंय.

 

News English Summary: At present, the atmosphere in the country has deteriorated to such an extent that the name of Modi has been created in the minds of ordinary citizens who are suffering from hell. The BJP is also aware of this, which has raised concerns at the senior level in his party as well. Modi is the reason why BJP came to power and there is news that there is an atmosphere of great concern in BJP as people are angry with him. The ridiculous forms of ‘positivity’ in the Corona disaster have begun, even as RSS stalwarts understand it. Therefore, it is a convincing news that BJP is worried about what to do in the future as Modi’s name is declining.

News English Title: Loksabha Election 2024 will difficult for Modi and BJP party news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1593)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x