13 August 2022 3:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अजब! स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधवांना सोबत घेऊन मुंबईतील भ्रष्‍टाचारी व्यवस्थेला तडीपार करणार? भाजपने जो घाबरेल त्याला घाबरवलं आणि जो विकला जाईल त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांनी अनेकांची लायकीच काढली Mutual Fund Top Up | म्युच्युअल फंड टॉप-अपचा दुहेरी फायदा कसा घ्यावा, मजबूत नफ्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या Viral Video | ती चालत्या गाडीच्या खिडकीबाहेर बॅलेन्स टाकून नाचत होती, पण तिच्यासोबत असं काही धक्कादायक घडलं Horoscope Today | 13 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Small Saving Schemes | गुंतवणूकदारांना दुहेरी लाभ, या लहान बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा आणि टॅक्स सूट मिळवा Numerology Horoscope | 13 ऑगस्ट, अंकशास्त्रानुसार शनिवारसाठी तुमचा लकी नंबर, शुभ रंग आणि दिवस कसा असेल जाणून घ्या
x

TRP Scam | यूपीमार्गे CBI'कडून तपास ताब्यात घेण्याचा प्रयत्न ? | राज्य सरकार सतर्क

Central probe agency, registered FIR, TRP scam, Uttar Pradesh

मुंबई, २२ ऑक्टोबर : अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’ वाढवणाऱ्या या रॅकेटची व्याप्ती केवळ मुंबईसह महाराष्ट्रातच नव्हे, अन्य राज्यांतही पसरल्याचे अटक आरोपींच्या चौकशीत उघडकीस आले आहे. त्यानुसार, मुंबई गुन्हे शाखेची पथके तपासासाठी सात राज्यांमध्ये रवाना झाली होती. तर, अटक आरोपी बोमपेल्ली राव मिस्त्री याच्या बँक खात्यात १ कोटी रुपये जमा झाले होते. दर दोन महिन्याने त्याच्या खात्यात ४ ते ५ ठिकाणांहून २० ते २५ लाख जमा होत होते.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाचे (सीआययु) प्रमुख सचिन वाझे यांच्या पथकाने टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश करत ४ जणांना बेड्या ठोकल्या होत्या. यात हंसा कंपनीचा विशाल भंडारी, टीआरपीसाठी पैसे पुरविण्याचे काम करणारा बोमपेल्ली राव मिस्त्रीसह फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या मालकांचा समावेश आहे.

‘रिपब्लिक’च्या अनेक अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. एक पथक लखनऊला जाणार होते. त्याचवेळी सोमवारी लखनऊ पोलिसांनी स्थानिक चॅनेलने दिलेल्या तक्रारीनुसार टीआरपी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आता ‘रिपब्लिक’ मुंबईचा तपासही सीबीआयने करण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका संदर्भाच्या आधारे टीआरपी ‘घोटाळा’ प्रकरणात सीबीआयने FIR नोंदवल्याचं वृत्त राज्य सरकारकडे आलं आणि त्यानंतर राज्यसरकार सुशांतसिंग प्रकरणाचा अनुभव लक्षात घेऊन महत्वाचं पाऊल उचललं. यापूर्वी लखनौच्या हजरतगंज पोलिस ठाण्यात एका जाहिरात कंपनीच्या प्रवर्तकांच्या तक्रारीवरून दाखल केलेला खटला उत्तर प्रदेश सरकारने सीबीआयकडे सोपविला होता.

त्यानुसार केंद्र सरकारच्या CBI या चौकसी संस्थेला महाराष्ट्रात आता थेट तपास करता येणार नाही. राज्यात चौकशीसाठी येण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असा आदेश राज्य सरकारने काढला आहे. एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असेल तर CBI थेट राज्यात येवून चौकशी करू शकते. मात्र त्यासंदर्भात काही अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. त्याचाच वापर करत राज्य सरकारने सीबीआयच्या अधिकारांना कात्री लावली आहे. या निर्णयामुळे राज्यात तपास करण्याआधी राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या तपासाप्रमाणे हा तपास सीबीआयकडे देण्यासाठी काही जण जरी सर्वोच्च न्यायालयात गेले तरी या प्रकरणात मुंबई पोलिसांची बाजू भक्कम असल्याने तो नाकारला जाण्याची त्यांना खात्री आहे. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीसह अन्य दोन स्थानिक चॅनेलवर गुन्हा दाखल केला. आतापर्यंत एकूण ८ जणांना अटक केली आहे. त्याशिवाय ‘रिपब्लिक’च्या अनेक अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. एक पथक लखनऊला जाणार होते. त्याचवेळी सोमवारी लखनऊ पोलिसांनी स्थानिक चॅनेलने दिलेल्या तक्रारीनुसार टीआरपी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आता ‘रिपब्लिक’ मुंबईचा तपासही सीबीआयने करण्याची मागणी केली आहे.

 

News English Summary: This comes a day after the central probe agency registered an FIR in the TRP ‘scam’ case based on a reference from the Uttar Pradesh Police. The case, which was earlier registered at Hazratganj police station in Lucknow on a complaint of an advertising company promoter, was handed over to the CBI by the UP government.

News English Title: This comes a day after the central probe agency registered an FIR in the TRP scam in Uttar Pradesh News updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(167)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x