28 June 2022 11:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांना या 'गेम प्लॅन' पासून ठेवलंय अंधारात | शिंदे आणि भाजपचा गेम प्लॅन बाहेर येतोय Multibagger Penny Stocks | हा 3 रुपयांचा पेनी शेअर करतोय मालामाल | आजही खरेदीला खूप स्वस्त Inflation Effect | पीठानंतर आता तांदूळ अजून महागणार आहे | तुमच्या किचनचा खर्च वाढणार Multibagger Stocks | तुम्ही सुद्धा असे शेअर निवडा | या शेअरने फक्त 10 महिन्यात 960 टक्के परतावा दिला Demat Deactivated | तुमचे डीमॅट खाते डिऍक्टिव्हेट होईल | फक्त 3 दिवस उरले | हे काम लवकर करा PPF Investment | मुलाच्या नावेही उघडता येईल पीपीएफ खाते | फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या New Labour Codes | तुम्ही 1 वर्ष नोकरी केल्यानंतरही मिळणार ग्रॅच्युइटीचे पैसे | पैशाचं गणित जाणून घ्या
x

खळबळ | NCB'ने अटक केलेल्या ड्रग्स पेडलरसोबत अमृता फडणवीसांचा फोटो | वानखेडे कारवाई करणार?

Amruta Fadnavis With drug Peddler

मुंबई, 01 नोव्हेंबर | राज्यात आणि देशात सध्या ड्रग्स प्रकरणावरुन बराच गदारोळ सुरु आहेत. अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात महाराष्ट्रात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि समीर वानखेडे गोत्यात आलेले असताना रोज भाजप संबंधितांचे कनेक्शन्स उघड होतं आहेत. मात्र, असं असताना आता निशांत वर्मा या राजकीय विश्लेषकाने अमृता फडणवीसांचा एक फोटो शेअर करुन भाजपवर गंभीर (Amruta Fadnavis with Drgus Peddler Jaydeep Chandulal Rana) आरोप केले आहेत.

Amruta Fadnavis with Drgus Peddler Jaydeep Chandulal Rana. Political analyst Nishant Verma has shared a photo of Amrita Fadnavis and made serious allegations against the BJP :

निशांत वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक फोटो शेअर करुन भाजपचं ड्रग्स नेक्सस असं म्हटलं आहे. हा फोटो अमृता फडणवीस यांचा असून यामध्ये ‘जयदीप चंदूलाल राणा‘ असल्याचा दावा निशांत वर्मा यांनी केली आहे. त्यांच्या मते, जयदीप राणा हा एक ड्रग्स पेडलर असून त्याला जून 2021 मध्येच अटक करण्यात आली होती.

निशांत वर्मा यांचा काय आरोप?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर केला असून त्यांच्यासोबत जयदीप चंदूलाल राणा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निशांत वर्मा यांच्या मते, ‘जयदीप राणा हा एक ड्रग्स पेडलर असून त्याला जून 2021 मध्ये एनसीबीने अटक केली आहे. जो अद्यापही तुरुंगातच आहे. अशावेळी भाजपचं त्याच्या नेमकं कनेक्शन काय?’ असा सवाल विचारत निशांत वर्मा यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Amruta Fadnavis With drug Peddler Jaydeep Chandulal Rana.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x