12 February 2025 12:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ पोहोचला आईआरबी इन्फ्रा शेअर, पुढे तेजी येणार का - NSE: IRB RVNL Share Price | 5 महिन्यात तुफान तेजीत परतावा देणारा शेअर सातत्याने घसरतोय, पुढे काय होणार – NSE: RVNL Gold Selling Tips | घरामधील जुनं सोनं विकण्याचा विचार करताय? तत्पूर्वी ही बातमी वाचा, कदाचित विचार बदलू शकतो Jio Finance Share Price | जवळपास 36 टक्क्यांनी घसरलेला जिओ फायनान्शिअल शेअर खरेदी करावा का? अपडेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Steel Share Price | पटापट घसरतोय टाटा स्टील शेअर, गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | 100 रुपयांच्या पार जाणार हा 73 रुपयांचा पावर शेयर, की 50 रुपयांच्या खाली घसरणार? - NSE: NHPC Multibagger Mutual Fund | शेअर्स नको, या फंडाच्या स्कीममध्ये महिना 2000 रुपये बचतीवर मिळतील 2.47 कोटी रुपये
x

Viral Video | बाब्बो! हरियाणवी गाण्यावर शिक्षिका मॅडम जोमात अन् विद्यार्थी कोमात... डान्सचा व्हिडिओ VIRAL

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ पाहून नेटकरी हसून हसून लोटपोट होतात. तर काही गाण्यांचे आणि डान्सचे व्हिडिओ पाहून आपले पाय देखील त्या गाण्याच्या तालावर ताल धरत नाचू लागतात. शाळेमध्ये मॅडम विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी शिकवतात. प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना जेवनापासून ते शाळेतील स्नेहसंमेलनातील डान्स देखील मॅडम अथवा सर जे कोणी शिक्षक असतील ते शिकवत असतात. तर सध्या सोशल मीडियावर एका शिक्षिकेचा जबदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Trending Video)

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पतली कमरी हाय हाय हाय… या भोजपूरी गाण्यावर शिक्षिका आणि वर्गातील लहान मुलं नाचताना दिसली होती. त्यांचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. तशाच प्रकारे आता देखील या शिक्षिकेचा डान्स पाहून सर्वजन हा व्हिडिओ एन्जॉय करत आहेत. व्हिडिओमध्ये गुलाबी रंगाच्या साडीत एक तरुणी शिक्षिका भन्नाट डान्स करताना दिसली आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ही तरुण शिक्षिका साडी नेसून “बेबी मेरे बर्थडे पर गोली चलेगी” या हरियानाच्या गाण्यावर डान्स करत आहे. यावेळी तिने लावलेले ठुमके पाहून नेटकरी घायाळ झालेत. शाळेमध्ये सर्व विद्यार्थी या मॅडमच्या डान्सचा आनंद घेत आहेत. यामध्ये शिक्षिकेने एका पेक्षा एक अशा डान्स स्टेप्स केल्या आहेत. डान्ससोबतच शिक्षिका हे गाणं देखील बोलताना दिसत आहे. तसेच गाण्याचे जसे बोल आहेत तसेच हावभाव तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farana Arshad Khan (@farana375)

हा व्हिडिओ याच वर्षी ३ जानेवारी रोजी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. तेव्हापासून हा व्हिडिओ चर्चेत आहे. तसेच आता हा व्हिडिओ जास्तच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ५ लाखांहून अधिक विव्युज मिळालेत आणि २२ हजारांहून जास्त व्यक्तींनी व्हिडिओ लाईक केला आहे.

आता या शिक्षिकेने केलेला डान्स व्हिडिओपाहून काही नेटकरी यावर खंत व्यक्त करत आहेत. एका शिक्षिकेने असे नाचावे का? असा प्रश्न एका व्यक्तीने कमेंटमध्ये विचारलाय. तर काहींनी या मॅडमचं कौतुक केलं आहे. काही कमेंट अशा देखील आहेत ज्यामध्ये तरुण दु:ख व्यक्त करत आहेत. सध्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले अथवा जे नोकरी करत आहेत अशा मुलांचं असं म्हणणं आहे की, एवढ्या भारी मॅडम आमच्यावेळी का नव्हत्या. यासह अनेक मजेशीर कमेंट या व्हिडिओवर आल्या आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of teacher dancing on Haryanvi song check details on 02 April 2023.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x